वृत्तवाहिनीच्या वार्ताहर व निवेदक यांच्यावर कारवाईचे आदेश - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१६ एप्रिल २०२०

वृत्तवाहिनीच्या वार्ताहर व निवेदक यांच्यावर कारवाईचे आदेश



मुंबई/ प्रतिनिधी
एका नामांकित वृत्तवाहिनीने १५ एप्रिल ला सकाळ पासून @Awhadspeaks यांच्या मुलीबद्दल धादांत खोटी व चुकीची बातमी चालवली गेली ज्यात ती स्पेन हून येताना कोरोना +ve असल्याचा खोटा दावा केला गेला. विशेष म्हणजे कोणत्याही कोरोना रूग्णचे नाव जाहीर न करण्याच्या आचारसंहितेची पायमल्ली केली.

कायद्यानुसार सुध्दा मुलींचं नाव जाहीर न करण्याचे नियम आहेत. गैर जबाबदारपणे बेछूट हेतूपुरस्सर या वृत्तवाहिनीने जे केलं ते अत्यंत गंभीर आहे.
देशाभरात कोरोना संसर्ग व प्रादुर्भावामुळे भीतीचं वातावरण असताना घब्राट पसरवणाऱ्या खोट्या बातम्या दाखवणं खूपच चुकीचं आहे.

त्यामुळे या बातमीची वार्ताहर व निवेदक यांच्यावर नियमानुसार कारवाईचे आदेश दिले गेलेले आहे, अशी माहिती राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

समाजमाध्यमांवर तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. कोणाचीही गय केली जाणार नाही. त्यानुसार आतापर्यंत 201 गुन्हे दाखल करण्यात आले असून 37 जणांना अटक करण्यात आली आहे.