विलगीकरण कक्षात असलेल्या नागरिकांना पद्मशाली फाउंडेशनतर्फे चहा नाश्त्याची व्यवस्था - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३० एप्रिल २०२०

विलगीकरण कक्षात असलेल्या नागरिकांना पद्मशाली फाउंडेशनतर्फे चहा नाश्त्याची व्यवस्था
निफन्द्रा(प्रतिनिधी)
येथून जवळच असलेल्या पाथरी येथील कामगार कोरोनाच्या संकटामुळे लॉक डाउनमूळे बाहेर जिल्ह्यात अडकलेल्या कामगार वर्गानी लॉक डाउन खुले होणार नाही हे लक्षात येताच आपला पायी मार्ग निवडत कशेबसे आपल्या स्वगावी परतले. परंतु गावात आल्यानंतर बाहेरून आल्यामुळे त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र व स्थानिक ग्रामपंचायत शासन यांच्या मार्फतीने त्यांना जिल्हा परिषद हायस्कुल पाथरी येथे विलगीकरण कशात ठेवण्यात आले. ही बाब पाथरी येथील पदमशाली फौंडेशन चे संचालक प्रफुल तुम्मे व राकेश चेन्नूरवार यांच्या लक्षात येताच सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासूनच सकाळी नाश्ता व दुपारी चहा ची व्यवस्था सातत्याने रोज करीत आहे. कोरोनाच्या या संकटकाळी मानवधर्म जोपासत प्रत्येकाला मदतीचा हाथ पुढे करीत आहे. या कोरोनाच्या संकटकाळी या फौंडेशन ने सुरुवातीपासूनच कोरोनाशी दोन हात करीत गावामध्ये पत्रके वाटून जनजागृती केली. कपड्याचे मास्क स्वतः शिवून वाटप केले. लोकांना घरीच रहा सुरक्षित रहा अशी जनजागृती केली. गरजूना वेळोवेळी मदत करण्यासाठी पाथरी येथील प्रफुल तुम्मे व राकेश चेन्नूरवार सातत्याने प्रयत्न करीत आहे. गाव माझा मी गावाचा ही भावना जोपासत पाथरी येथील पद्मशाली फौंडेशन संचालक करत असलेल्या कामाची परिसरात चर्चा असून स्तुती केल्या जात आहे.