आरोग्यसेतू अॅप डाऊनलोड करा : पोलीस ठाणे नवेगावबांध येथे कोरोनाव्हायरस प्रतिबंधक कार्यशाळा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१६ एप्रिल २०२०

आरोग्यसेतू अॅप डाऊनलोड करा : पोलीस ठाणे नवेगावबांध येथे कोरोनाव्हायरस प्रतिबंधक कार्यशाळा
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय राऊत यांचे मार्गदर्शन


संजीव बडोले/नवेगावबांध.

दिनांक 15 एप्रिल 2020
नवेगावबांध:-पोलीस ठाणे नवेगावबांध येथे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दिनांक 15 एप्रिल ला कोरोना प्रतिबंधक कार्यशाळा संपन्न झाली .जगभरासह देशात व राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोविड-19 या या जीवघेण्या कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्याचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. या काळात संचार बंदीची व लॉक डाऊन अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस विभाग अहोरात्र परिश्रम घेत आहे. त्यामुळे पोलिसांचे आरोग्य सुरक्षित रहावे, त्यांना कर्तव्य बजावत असताना स्वतःची काळजी कशी घ्यावी. यावर खबरदारी उपाय म्हणून नवेगावबांध पोलीस ठाण्यात दिनांक 15 एप्रिल रोज बुधवार ला
कोरोनाव्हायरस प्रतिबंधक कार्यशाळा पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच सी-60 पथकातील जवानांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेला कोरोनाव्हायरस प्रतिबंध कसा करावा? याची लक्षणे काय?या बाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय राऊत अर्जुनीमोर यांनी पोलीस ठाण्यातील अधिकारी,कर्मचारी व सी- 60 पथकातील जवान यांना मार्गदर्शन केले. डॉक्टर विजय राऊत तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी पोलिस स्टेशन अधिकारी कर्मचारी यांना कोरोना विषाणु पासुन बचाव करण्यासाठी उपाययोजना बाबत माहिती दिली. तसेच आरोग्य शेतु अॅप डाऊनलोड करण्यासाठी आवाहन केले व त्याबाबत माहिती समजावून सांगितली. सॅनिटाईझ बाबत सविस्तर माहिती दिली. हात स्वच्छ करण्याची पद्धत समजावून सांगितले. तसेच कोरोना फ्फुफुसावर कशाप्रकारे नियंत्रण मिळवतो. याबाबत माहिती देऊन, आपली रोगप्रतिकारक शक्ती कशाप्रकारे वाढवून कोरोना विषाणुला आपल्या पासुन दुर ठेवायचे याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक दिनकर ठोसरे, सी-60 पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बिचेवार आणि ए ओ पी चे वागज यांच्यासह, ठाण्यातील सर्व पोलिस कर्मचारी सी- 60 पथकातील जवान बहुसंख्येने उपस्थित होते.