उमरी, सावरटोला येथे शालेय पोषण आहाराचे विद्यार्थ्यांना वाटप - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१७ एप्रिल २०२०

उमरी, सावरटोला येथे शालेय पोषण आहाराचे विद्यार्थ्यांना वाटप


178 विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

संजीव बडोले/नवेगावबांध
नवेगावबांध :- सम्राट अशोक विद्यालय उमरी व जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा सावरटोला येथे दिनांक 17 एप्रिल रोज शुक्रवारला सकाळी 7.30 वाजता शाळेतील विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना इयत्ता पहिली ते सातवी च्या 106 तर सम्राट अशोक विद्यालयात वर्ग 5 ते 8 च्या 72 विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातील शिल्लक साठ्यातील तांदूळ, डाळ व कडधान्य याचे वाटप करण्यात आले.
Covid-19 या कोरोनाव्हायरस त्‍या प्रादुर्भावामुळे उपाय योजनेचा एक भाग म्हणून राज्यातील विद्यार्थ्यांना संसर्ग होऊ नये. यासाठी 30 एप्रिल या कालावधीत सर्व शाळांना सुट्ट्या घोषित केल्या आहेत. या सुट्टीच्या कालावधीतील शिल्लक असलेल्या साठ्यातील तांदूळ ,डाळ व कडधान्य विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटप करावे. असे शासनाचे आदेश आहेत. त्या अनुषंगाने या शालेय पोषण आहार योजनेतील शिल्लक साठ्यातील तांदूळ, डाळ व कडधान्य वाटप दिनांक 17 एप्रिल ला शाळेत करण्यात आले. विद्यार्थी व पालकांनी सामाजिक अंतर राखून शालेय पोषण आहार घेतले. सम्राट अशोक विद्यालयातील 72 विद्यार्थ्यांनी या पोषण आहाराचा लाभ घेतला यावेळी मुख्याध्यापक एस. एस. टेंभुर्णे, एस. व्ही. बडोले, एम. यु. घरोटे तसेच शिक्षकेतर कर्मचारी बी. आर. पंचलवार, एम. एम. साखरे, राकेश वालदे.तर जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा सावरटोला येथे मुख्याध्यापक उज्ज्वला मेंढे व शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी लॉकडावून च्या काळात घरीच थांबावे. कोरोणाविषयी दक्षता घ्यावी व आनलाईन स्टडी च्या चाचण्या सोडवाव्यात. असे आवाहन मुख्याध्यापक टेंभुर्णे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.