लॉकडाऊन पासून आशीष 24 तास करीत आहे,पोलिसांची निस्वार्थ सेवा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१७ एप्रिल २०२०

लॉकडाऊन पासून आशीष 24 तास करीत आहे,पोलिसांची निस्वार्थ सेवा


नागपूर /अरूण कराळे:
लॉकडाऊन मुळे गरजवंताना अनेक सामाजिक मदतीकरीता रस्त्यावर उतरली आहे. लॉकडाऊनची व्यवस्था शांततेत पार पाडण्याकरिता व कुठल्याही प्रकारचे शासनाचे नियमाचे उल्लंघन न व्हावे याकरीता पोलीस प्रशासन  नेहमीच  तत्पर राहिली आहे. गरजूंच्या मदतीकरीता समोर आलेल्या अनेक संस्था आहे. मात्र कोरोना विषाणू सोबत खंबीरपणे लढा देणारे डॉक्टर व पोलिस प्रशासनाचे आभार जितके मानावे  तितके कमीच आहे .

 पोलीस प्रशासन  नेहमी आपल्या जीवाला जोखीम पत्करुन   कार्य करीत आहे . लॉकडाऊनच्या काळात कुठेच चहा नास्ताचे दुकान राहणार नाही . त्यामुळे पोलीसांना कोण चहा नास्ता देणार ही खंत मनाशी बाळगुण दत्तवाडीतील खाजगी व्यवसाय करणारा अशिष गजभिये वय ३९  हा  युवक गेल्या २४ मार्च  लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासूनच सतत पोलिसांची मदत करीत आहे.  पोलिसांना दररोज स्कूटरवरून सकाळी व संध्याकाळी चहा, नाश्ता ,बिस्कीट, सॅनीटाईझर, पाणी आदीची मदत करीत आहे  . ही मदत वाडी पोलिस स्टेशन,एमआयडीसी टी पाईंट, नाका नंबर १०, एमआयडीसी पोलीस स्टेशन,हिंगणा टी पाईंट,प्रताप नगर असे अनेक पाईंट वर हजर असलेल्या पोलिसांना आपले कर्तव्य समजून मदत करीत आहे .

 त्यांनी या उपक्रमाचे नाव  'मेरा भारत महान' असे ठेवले आहे. आशिष च्या कार्याला बघून अनेक मित्रांनी त्यांना ऑनलाईन पेमेंट द्वारा पोलिसांच्या मदतीकरीता मदत पाठविली आहे.  मित्रमंडळीनी त्याचे कौतुक केले आहे. या कार्यासाठी संदेश गणवीर, नितेश मोहोड, दिवाकर मोहोड  यांनी साथ दिली .