दवलामेटी ग्रामपंचायतची दिव्यांगांना ४ लाख २१ हजाराची मदत:संकटकाळी धावली ग्राम पंचायत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१८ एप्रिल २०२०

दवलामेटी ग्रामपंचायतची दिव्यांगांना ४ लाख २१ हजाराची मदत:संकटकाळी धावली ग्राम पंचायत

घरोघरी जाऊन केली मदत
नागपूर : अरूण कराळे
लॉकडाऊनच्या काळात दिव्यांग व्यक्तीचे जिवन जगणे असाहय झाले असेल हीच भावना लक्षात घेता दवलामेटी ग्रामपंचायत दिव्यांग नागरीकांच्या मदतीसाठी पुढे येत ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या दिव्यांगाना एकुण ४ लाख २१ हजार रूपयाची मदत केली आहे .

यामध्ये ४७ दिव्यांगांना दोन लॅपटॉप , दोन कर्णयंत्र , बारा शौचालयसाठी निधी देण्यात आला . ग्रामविकास अधिकारी विष्णू पोटभरे यांनी सांगीतले की प्रती दिव्यांग एक हजार रुपये महीना प्रमाणे तीन महीन्याचे तीन हजार रुपये घरपोच नेऊन दिले . काही दिव्यांगांना व्यवसायासाठी २५ हजार रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. काही दिव्यांगांनी कमोट शौचालयाची मागणी केली होती त्यांना कमोट शौचालयासाठी तसेच सुखदेव नारायण सुखदेवे, आशा भीमराव वासनिक यांच्यासह १४ दिव्यांगांना  सरपंच आनंदाबाई कपनीचोर, उपसरपंच गजानन रामेकर  यांनी  धनादेश वाटप  केला

 या वेळी ग्रामविकास अधिकारी विष्णू पोटभरे , ग्रा.पं. सदस्य नितीन अ‍डसड , माजी सरपंच संजय कपनीचोर,ग्रा.पं.कर्मचारी  सुरेंद्र शेंडे, मनोज गणवीर, उमेश वाघमारे, संध्या इंगळे, रजनी धारूकर  प्रामुख्याने उपास्थित होते.