उर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची महापारेषणच्या प्रादेशिक भार प्रेषण अंबाझरी नागपूर केंद्राला तातडीची भेट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०५ एप्रिल २०२०

उर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची महापारेषणच्या प्रादेशिक भार प्रेषण अंबाझरी नागपूर केंद्राला तातडीची भेट

नागपुर/प्रतींनिधी:
आज राज्याचे उर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी महापारेषणच्या प्रादेशिक भार प्रेषण अंबाझरी नागपूर केंद्राला भेट दिली. 

राज्यभरातील पारेषण विद्युत वाहिनीच्या जाळ्यांच्या सुदृढतेबाबत तसेच रात्री ८ ते १० च्या काळातील करण्यात आलेल्या पूर्वतयारीबाबत सविस्तर आढावा घेतला. ह्या केंद्राचे मुख्य अभियंता श्री.भाऊराव राऊत आणि अधिकारी वर्गास त्यांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. उर्जामंत्री आज रात्री विद्युत भवन नियंत्रण कक्ष येथून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवणार आहेत.