समाज जनजागृती करिता पत्रकाराची भुमिका महत्त्वाची:डॉ.राहुल ठवरे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२२ एप्रिल २०२०

समाज जनजागृती करिता पत्रकाराची भुमिका महत्त्वाची:डॉ.राहुल ठवरे

वाडीत पत्रकारांची आरोग्य तपासणी
नागपुर:अरूण कराळे:
सद्यस्थितीत सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या प्रकोपाला समाजातील प्रत्येक घटक बळी पडत असतांना आपल्या जीवाची पर्वा न करता पोलीस,डॉक्टर समाजाची सेवा करीत असतांना राज्यात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडी व शासकीय नियम व सूचनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवून जनजागृती करण्याची महत्वाची भूमिका पत्रकार पार पाडतो म्हणून त्यांच्या आरोग्याची जबाबदारी आपणावर आहे त्यासाठी आमचे हॉस्पिटल सदैव तत्पर असून यापुढे पत्रकारांची निःशुल्क आरोग्य तपासणी करण्याची ग्वाही डॉ. राहुल ठवरे यांनी दिली.
नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग वाडी
येथील वेल्ट्रीट मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे संचालक डॉ. राहुल ठवरे यांच्या मार्गदर्शनात डॉ. कौस्तुभ वंजारी,डॉ. अश्विनी ठवरे,डॉ.राजेश रवंदे यांनी वाडी प्रेस क्लबचे संचालक स्थानिक पत्रकार विजय खवसे,सुरेश फलके ,अरुण कराळे,सुनील शेट्टी,समाधान चौरपगार,सौरभ पाटील यांची आरोग्य तपासणी,विविध चाचण्या करून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घ्यावयाची दक्षता तसेच सुरक्षा सूत्रांची सविस्तर माहिती दिली.यावेळी रवी धुर्वे,सोयब शेख,सचिन कापगते,अंशु कौंडारकर,अंजली नरुले,विपीन समर्थ,राजेश ढोले,प्रतिभा सावरकर,उमा नलवाडे, विशाखा इंगळे,सीमा ढोके प्रामुख्याने उपस्थित राहून सहकार्य केले.