रमजानमधील ‘तरावीह’ची नमाज घरीच पढावी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१६ एप्रिल २०२०

रमजानमधील ‘तरावीह’ची नमाज घरीच पढावी

नागपूर/प्रतिनिधी:
इस्लाममध्ये पवित्र रमजान महिण्यात तीस दिवस पहाटे ते सायंकाळपर्यंत दिलेल्या वेळेत निर्जल उपवास करायचा असतो याला ‘रोजा’ म्हणतात. सोबतच रमजान महिण्यात रात्रीच्या (इशा) नमाजनंतर महिनाभर ‘तरावीह’ची नमाज ‘अदा’ केली जाते.  देशात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि ३ मे पर्यंत लॉकडाउन असल्यामुळे मुस्लीम बांधवांनी तरावीहची नमाज आपल्या घरीच पढावी असे आवाहन जामिया अरबिया इस्लामियाच्या वतीने करण्यात आले आहे.

२५ एप्रिलपासून रमजान महिण्याला सुरुवात होत असून, याच्या पूर्वसंध्येपासून अर्थात २४ एप्रिलपासून तरावीहची नमाज सरू होईल. २५ एप्रिल ते २४ मे पर्यंत चालणा-या रमजान महिण्यात उपास (रोजा) ठेवण्यापूर्वी पहाटे केली जाणारी न्याहारी (सेहरी) आणि सायंकाळी उपास सोडतांना केली जाणारी न्याहारी (इफ्तार) मुस्लिम बांधवांनी घरीच करावी असे आवाहनही जामिया अरबिया इस्लामियाचे काजी व मुफ्ती मोहम्मद अब्दुल कदीर खान व नागपूरचे सचिव मौलाना मोहम्मद अब्दूल अजीज खान यांच्या वतीने करण्यात आले आहे.