चंद्रपूरातील वेकोली कामगारांचे यवतमाळ जिल्ह्यात तर यवतमाळ येथील कामगारांचे चंद्रपूरात येणे जाने बंद करा:जोरगेवार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१६ एप्रिल २०२०

चंद्रपूरातील वेकोली कामगारांचे यवतमाळ जिल्ह्यात तर यवतमाळ येथील कामगारांचे चंद्रपूरात येणे जाने बंद करा:जोरगेवार

Jorgewar only MLA to switch support from BJP to MVA | Nagpur News ...
चंद्रपुर/प्र्तिनिधी:
वेकोलीचे जाळे चंद्रपूरसह यवतमाळ जिल्ह्यातही पसरले आहे. सध्या संचारबंदी असली तरी वेकोलीची सेवा अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने कोळसा खानी सुरु ठेवण्यात आल्या आहे. परिणामी लगतच्या यवतमाळ जिल्ह्यातील वेकोली कामगार कामाकरीता चंद्रपूरात येत आहे. तर चंद्रपूरातील कामगार हे यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा खानीत कामाकरीता जात आहे.

 विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने त्याला आँरेंज झोनमध्ये टाकण्यात आले आहे. त्यामूळे दक्षता म्हणून चंद्रपूरातील वेकोली कामगारांचे यवतमाळ जिल्ह्यात तर यवतमाळ येथील कामगारांचे चंद्रपूरात अवागमन बंद करण्यात यावे अशी सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांना दिली आहे. तसे निवेदन आ. किशोर जोरगेवार यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे. 

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने काटेकोर उपाययोजना करण्यात आल्या आहे. परिणामी प्रशासनाच्या उत्तम नियोजनासह चंद्रपूरकरांच्या सहकार्यामूळे आजपर्यंत चंद्रपूर जिल्हा कोरोनामूक्त राहला आहे. मात्र लगतच्या यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. असे असतांनासुध्दा चंद्रपूर येथील वेकोली कर्मचाऱ्याचे कर्तव्य बजावण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात अवागमन सुरु आहे.

 तसेच यवतमाळ जिल्ह्यातील काही वेकोली कर्मचारी कर्तव्यासाठी चंद्रपूरातील वेकोलीच्या खदानीत येत आहे. त्यामूळे यवतमाळ येथून कामगारांच्या माध्यमातून चंद्रपूरात कोरोनाचा प्रसार होण्याची भिती वर्तवली जात आहे ही गंभिर बाब लक्षात घेता ग्रिन झोन असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आँरेंज झोन असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील कामगारांच्या येण्यावर प्रतिबंध घालण्यात यावे व चंद्रपूरातील कामगारांनाही यवतमाळ जिल्ह्यात जाण्यास प्रतिबंधीत करण्यात यावे.

 अत्यावश्यक असल्यास योग्य ती तपासणी करुन त्यांना परवाणगी देण्यात यावी अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी यांना केल्या आहेत. 

तसेच वेकोलीच्या खदानीत कामगार काम करत आहे. मात्र काम करत असतांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथे उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. सामुहीक अंतर येथे पाळल्या जात नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. 

त्यामूळे वेकोली प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणीही आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने करण्यात आली आहे. वेकोलीत काम करत असलेल्या कामगारांना सुरक्षा म्हणून सॅनिटायजर व मास्क उपलब्ध करुन द्यावे असेही आ. जोरगेवार यांनी सांगीतले आहे.