शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे 220 खाटांचे अत्याधुनिक कोविड-19 सेंटर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२८ एप्रिल २०२०

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे 220 खाटांचे अत्याधुनिक कोविड-19 सेंटर


नागपुर/प्रतींनिधी:  
नागपुर २८ एप्रिल : नागपूर जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर उपचार करण्याकरिता शासकीय वैद्यक़िय महाविद्यालय, नागपूर येथे कोविड-१९ अत्याधुनिक सेंटर तयार करण्यात आले आहे. राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना.डॉ नितिन राऊत यांनी आज ह्या केंद्राला भेट दिली आणि आरोग्य सुविधांची पाहणी केली.

तीन मजली स्वतंत्र इमारतीत, वातानुकूलित कक्ष, 220 सुसज्ज खाटा, 40 व्हेंटीलेटर, 60 अतिदक्षता खाटा , 160 उच्च अवलंबित युनिट खाटा (एच.डी.यु.), 2 ए.बी.जी.मशीन, 3 हिमो डायलेसिस मशीन, रक्तपेढी, पॅथोलोजी लॅब, 3 पोर्टेबल एक्स.रे मशीन, 1 पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, समर्पित कोविड-19 शस्त्रक्रिया गृह, सर्व खाटांना मध्यवर्ती ऑक्सीजन पुरवठा प्रणाली, औषधालय, इत्यादि सोयी-सुविधा एकत्रितपणे ह्या केंद्रात उपलब्ध आहेत. 

30 खाटांचे “सारी” रुग्ण तपासणी, चांचणी आणि उपचार करण्याची सुविधा देखील ह्या केंद्रात आहे. रुग्णांवर उपचारासाठी तीन पाळीत वैद्यकीय चमू येथे तैनात राहणार आहे. त्यामुळे कोविड-19 रूग्णांना बरे करण्यात या केंद्राची महत्वपूर्ण भूमिका राहणार आहे. कोविड-19 मुळे दुर्दैवी मृत्यू झाल्यास 6 रुग्णांसाठी ह्या केंद्राच्या नजीक परिसरात शवगृह देखील आहे.  

पाहणी दरम्यान विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, डॉ. अविनाश गावंडे, मो. फजल, पवित्र पटनाइक, गोसावी, तिरपुडे, जनार्दन राठौड़, रूपेश ठाकरे, श्रीकांत पेरका, सारंग सावरबांधे, कंचन वानखेड़े, मालती डोंगरे आणि शहज़ाद बाबा खान प्रामुख्याने उपस्थित होते.