धक्कादायक:एकाच बसमध्ये बसलेल्या ५८ कर्मचाऱ्यांना पकडले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२२ एप्रिल २०२०

धक्कादायक:एकाच बसमध्ये बसलेल्या ५८ कर्मचाऱ्यांना पकडले

बसमध्ये ५८ प्रवाशी 
वाडी पोलीसाची कार्यवाही 
सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा
नागपूर:अरूण कराळे:
संचारबंदीतून काही कंपन्यांना सुट मिळाली असून त्यामुळे काही कंपन्यांचे काम सुरू झाले आहे .नियमांनुसार कंपन्यांमधील कर्मचार्‍यांना काम मिळावे यासाठी नियमानुसार कंपनी चालविण्याचे आदेश आहेत.परंतु नियम पाळणे कंपन्यांमधील कर्मचार्‍यांना गरजेचे आहे. 

वाडीतून कर्मचारी घेवून लॉजिस्टिक माइक्रो पार्क कंपनी येथे अमीना कंपनीची बस क्र.एम एच ३१डब्लू ७९३२ ही वाडी पोलिसांनी बुधवार २२ एप्रिल रोजी आठवा मैल डिफेंस गेट वर पकडण्यात आली. या बसने सकाळी ९ वाजता पहिल्या ट्रिपमध्ये २० कर्मचारी घेऊन गेली. दुसऱ्या ट्रिपमध्ये कर्मचारी जबरदस्तीने बसमध्ये बसल्याचे चालकांनी सांगीतले . बसला वाडी पोलिसांनी ताब्यात घेवून चालकासमवेत ५८ कर्मचाऱ्यांवर १८८ चा गुन्हा दाखल केला.