सेवा है यज्ञकुंड:वाडीनगर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वाडी दवलामेटी ,हिंगणा परिसरातील गरजूंना मदत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१५ एप्रिल २०२०

सेवा है यज्ञकुंड:वाडीनगर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वाडी दवलामेटी ,हिंगणा परिसरातील गरजूंना मदत

८१९ घरांला २२ दिवस दिली जीवनावश्यक वस्तुची सामुग्री 
नागपूर : अरूण कराळे:
वाडीनगर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी नि: स्वार्थ भावनेने ८१९ घरांला मगंळवार १४ एप्रिल पर्यंत २२ दिवस जीवनावश्यक वस्तुची सामुग्री नगर कार्यवाह दिनेश मंत्री यांच्या नेतृत्वात प्रत्यक्ष पोहचवून दिली . लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या स्थितीने समाज जिवनातील प्रत्येक क्षेत्र प्रभावित झाले आहे.

ज्या भागात अधिकांश श्रमिक मजूर वर्ग आहे अशा परिसराचा स्वयंसेवकांनी सर्वेक्षण केले असता अनेक घरात अन्न - धान्य ,किराणा संपले आहे . अनेक घरांमध्ये एकवेळच्याही जेवणाची सोय होऊ शकत नाही ,घरातील मुले उपाशी झोपत आहे . असे संघ स्वयंसेवकांच्या निदर्शनास आले. संघ स्वयंसेवक आपलेपणाच्या भावनेने सेवाकार्यात एकवटले .नागलवाडी पाडा ७६,अभिजित नगर ९७,शाहू ले आऊट(स्मुतीनगर ) २९,सत्यसाई ले आऊट ४,आदर्श नगर ४०,विकास नगर ४,वैष्णव माता नगर २,सोनबा नगर ४१,बकुताई नगर २१,हरिओम सोसायटी ,निर्मल नगर व उज्वल नगर १२३,महादेव नगर ५०,वाडी नाका १८ कोहळे ले आऊट २५, नवनीत नगर २७ ,सोनेगाव निपाणी ४,डिफेन्स कांजीहाऊस ६,वानाडोंगरी ३,संगम खैरी १५,दवलामेटी १७ ,बक्षी ले- आऊट ३५,डॉ.आंबेडकर नगर ४, गणेश नगर ,आठवामैल २५,शिवाजी नगर ३, मंगलधाम सोसायटी १३,हिंगणा एमआयडीसी १७,मारोतीनगर व धम्मकीर्ती नगर १७ ,गौतम नगर ९,टेकडी वाडी ३१,सुरक्षा नगर,दत्तवाडी परिसर ६,वैभव नगर ६,शुभंकर सोसायटी ८,शिवशक्तिनगर व त्रिलोक नगर ८, वेना नगर १३,साई नगर १०,इंदिरा नगर १२ असे एकुण ८१९ ठिकाणी २२ दिवस मदत पुरविली .

 कुठे जीवनावश्यक सामुग्रीची गरज भासली ,कुठे भाज्यांची गरज ,कुणाकडे औषधांची गरज भासली त्या सर्व गरजा पुरविण्यासाठी संघ स्वयंसेवकांनी सेवाकार्यास झोकून दिले. स्वयंसेवक येथेच थांबले नाहीत . सोशल डिस्टंसिंग गरजेचे असल्याने बाजार ,रेशन दुकान ,औषधांचे दुकान ,जिथे गर्दी होती तेथे प्रत्यक्ष जाऊन स्वयंसेवकांनी सोशल डिस्टंसिंगचा आग्रह धरला . 

मनात सहज सेवाभाव असेल आपलेपणाची भावना असेल ,समाज आपलाच आहे ही भावना असेल तर नि: स्वार्थ समाजाच्या सेवेत अग्रेसर होता येते . हीच भावना मनात ठेवून अनेक संघ स्वयंसेवक सब समाज के लिए साथ में आगे बढते है, या भावनेने मदत केली.