काेरोना बाधीत रुग्णांसाठी शाळा कर्मचारी पतसंस्थेची 1 लाख 51 हजार रुपयांची मदत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१९ एप्रिल २०२०

काेरोना बाधीत रुग्णांसाठी शाळा कर्मचारी पतसंस्थेची 1 लाख 51 हजार रुपयांची मदत

नागपूर : अरूण कराळे:
नागपूर डिस्ट्रिक्ट शाळा कर्मचारी क्रेडिट को ऑप सोसायटी, मेडिकल चौक, नागपूर कडून कोरोना संसर्ग बाधित लोकांसाठी आर्थीक मदत म्हणून एक लाख एक्कावन हजार रुपयाचा धनादेश जिल्हाधिकारी सहाय्यता निधीसाठी शनिवार १८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांना सर्व संचालक व सभासदांच्या वतीने पतसंस्थेचे सचिव अनिल गोतमारे व संचालक धनराज राऊत यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी प्रभारी अध्यक्षा सरिता मदनकर ,सहसचिव प्रकाश नेरकर,कोषाध्यक्ष दत्तराज उमाळे , संचालक पांडुरंग लांबट, सत्तमराज मेश्राम, जयंत बुधे, सतीश गजभिये, मनीषा तिडके, चंद्रशेखर भिसे, नरेश कामडे, योगेंद्र शाहू, प्रभाकर कापसे यांनी सहकार्य केले .