जीवनाश्यक वस्तू विक्रेत्याने वस्तूचे दरपत्रक लावा;अन्यथा फौजदारी कार्यवाहीसाठी तयार राहा:मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१९ एप्रिल २०२०

जीवनाश्यक वस्तू विक्रेत्याने वस्तूचे दरपत्रक लावा;अन्यथा फौजदारी कार्यवाहीसाठी तयार राहा:मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले

नागपूर : अरुण कराळे:
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनाकरीता
लॉकडाऊनमध्ये शासनाच्या नियमाचे परिपूर्ण पालन व्हावे त्याअनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा -१८९७ अन्वये प्रादुर्भाव रोखण्याकरिता सार्वजनिक स्थळी थुंकण्यावर बंदी, चेहऱ्यावर कायम मास्क वापरणे, सोशल डिस्टसिंग पाळणे गरजेचे आहे. या बाबींचे पालन व्हावे याकरिता उल्लंघन करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर २०० ते दोन हजार रुपयापर्यंत दंड ठोठावण्यात येणार आहे.

भाजी विक्री दुकानावर सोशल डिस्टेंसिंग चा वापर न केल्यास पहिल्यांदा ५०० रुपये दंड तसेच दुसऱ्यांदा फौजदारी कार्यवाही वाडी नगर परीषद द्वारा केली जाणार आहे. तसेच किराणा,जीवनाश्यक वस्तू विक्रेत्याने वस्तूचे दरपत्रक न लावल्यावर दोन हजार रुपये दंड व दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. 

आदेशाची अवमानना करणार्‍या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ शिक्षापात्र असलेले अपराध केले असून असे मानण्यात येईल व तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५,साथरोग प्रतिबंधात्मक कायदा-१८९७ कोविड-१९ उपाययोजना नियम २०२० अंतर्गत संबंधितांवर कारवाई करणार असल्याची माहिती वाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी दिली.