धक्कादायक:चंद्रपुर: 14 वर्षीय मुलीवर अत्याचार;आरोपीला अटक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

धक्कादायक:चंद्रपुर: 14 वर्षीय मुलीवर अत्याचार;आरोपीला अटक

चंद्रपुर/विशेष प्रतींनिधी: 

चंद्रपुर पासून जवळच असलेल्या घुग्गस,नकोडा गावात एक किळसवाणा प्रकार घडला. एका नराधमाने घराशेजरी राहणार्‍या एका 14 वर्षाच्या मुलीवर लागोपाठ अत्याचार केला. हा प्रकार सतत 5  महिन्यान पासून सुरू होता अशी प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे ही आपली आजोबासोबत राहते, या नराधमाने मुलीला वेगवेगळे फूस लावून अत्याचार केला. 


नकोडा निवासी संजय नवले (24)असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी छेडछाड. जीवे मरण्याची धमकी आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

या घटनेची तक्रार पीडितेने आपल्या आजोबांना घेऊन घुग्घुस पोलीस स्टेशन येथे दिली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांनी घुग्घुस पोलीस स्टेशनला भेट दिली.या घटनेचा पुढील तपास घुग्गुस पोलीस करीत आहेत .