उद्योगांना अखंडित वीजपुरवठा द्या: डॉ.नितीन राऊत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१९ एप्रिल २०२०

उद्योगांना अखंडित वीजपुरवठा द्या: डॉ.नितीन राऊत


नागपूर/प्रतिनिधी:
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि लोकडाऊनमुळे बंद असलेले उद्योग सोमवार  २० एप्रिलपासून काही अटी व शर्तींच्या अधीन राहून सुरू होणार आहेत. ह्या उद्योगांना अखंडित वीजपुरवठा देण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज नागपूर जिल्हा ग्रामीण दौऱ्यातील बैठकीत दिले.

सोमवारपासून काही उद्योगांना अटी व शर्तींच्या अधीन राहून सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचा आढावा बुटीबोरी, हिंगणा,कलमेशवर, कामठी आणि मौदा भागातील उद्योजकांना भेटून पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आढावा घेतला. महिनाभरापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून औद्योगिक क्षेत्राला टाळे लागले आहे.यामुळे नव्याने हे क्षेत्र सुरू होण्यास सज्ज आहे.

बंद उद्योग हळूहळू सुरू होणार आहे.परिणामी वीजेची मागणी त्या गतीने वाढेल.वाढत्या विजेच्या मागणीची पूर्तता महावितरण कडून पूर्ण करण्यात येईल असा त्यांनी विश्वास दिला.  महावितरणने औद्यीगिक परिसरातील देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याच्या सुचना महावितरण अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी महावितरणचे प्रभारी मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधिक्षक अभियंता नारायण आमझरे, कार्यकारी अभियंता अमित परांजपे, दिलीप घाटोळ,कुलदीप भस्मे प्रामुख्याने उपस्थित होते.