द्रुगधामना हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांना धान्य व धान्यादी मालाचे वाटप :संचारबंदी नियमांचे पालन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०५ एप्रिल २०२०

द्रुगधामना हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांना धान्य व धान्यादी मालाचे वाटप :संचारबंदी नियमांचे पालन

नागपूर : अरूण कराळे
तालुक्यातील दवलामेटी येथील द्रुगधामना हायस्कूल मध्ये शनिवार ४ एप्रील व रविवार ५ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता ते ११ वाजता पर्यंत वर्ग ५ ते ८ मधील एकुण १८५  विद्यार्थीपैकी १६०  विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारांतील तांदुळ ,तुरदाळ व वाटाणाचे सम प्रमाणात वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे धारा १४४ लॉकडाऊन शासकीय नियमांचे पालन करीत सर्व विद्यार्थ्यांना विशेष अंतरावर वर्तूळे आखून  ठेवण्यात आले  .
 प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातावर सॅनेटायझर टाकून तोंडाला मास्क  किंवा रुमाल बांधूनच वाटप करण्यात आले. लॉकडाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांना मिळणारे हक्काचे भोजन बंद झाले होते. आणीबाणीच्या प्रसंगी शाळेतील वर्ग १ ते ८वी मधील सर्व विद्यार्थ्यांना शाळेत शिल्लक असणारा तांदुळ व डाळी यांचे समप्रमाणात वाटप करण्यात यावे  जेणेकरून कोणताही विद्यार्थी आहारापासून उपाशी राहू नये या उद्देशाने राज्य शासन व मा. न्यायालयाच्या आदेशानुसार वाटप करण्यात आल्याचे प्राचार्य सुरेंद्र मोरे यांनी सांगीतले .


  यावेळी वितरण उपक्रमात प्राचार्य सुरेंद्र मोरे , शिक्षक अरूण कराळे ,वसंत हरले ,लक्ष्मण खडसे ,प्रकाश मस्के ,सुनीता चव्हाण ,वंदना जांभुळकर ,वंदना मुसळे ,वैशाली लोही ,गीता प्रजापती ,केवलचंदा लांजेवार ,राजू शेळके ,शंकर राऊत यांनी सहकार्य केले.