वाडीत विवाहीतेची गळफास लावून आत्महत्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३० एप्रिल २०२०

वाडीत विवाहीतेची गळफास लावून आत्महत्या

११ महिन्यापूर्वी झाले होते लग्न
नागपूर : अरूण कराळे 
नागपूर गिट्टीखदान पोलिस स्टेशन क्षेत्रात येणाऱ्या टेकडी वाडी सारिपूत्र नगर येथील विवाहीतने आत्महत्या केल्याने परिसरात एकच खडबळ उडाली आहे.

प्राप्त माहीतीनुसार टेकडी वाडी सारिपूत्र नगर येथील रहीवासी मृतक स्वाती रोशन गायकवाड हिने गुरुवारला पहाटे २. ३०वाजताच्या सुमारास घरातील छताच्या लोखंडी हुकला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली.स्वातीचा पती रोशन बाथरूम करीता उठल्यावर त्याला स्वाती छातावर लटकलेल्या अवस्थेत दिसून आली. रोशनच्या वडिलांनी कंट्रोल रूमला माहिती दिली असता वाडी पोलिस स्टेशन पोलीस घटनास्थळी पोहचले.

परंतु घटनास्थळ गिट्टीखदान पोलिस स्टेशन येत असल्यामुळे गिट्टीखदान पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा केला व शव विच्छदानाकरिता शासकीय रुग्णालयात पाठविले. मृतक स्वातीचे ११ महिने पूर्वी लग्न झाले होते.दोघात काहीच वाद नव्हता.अशी माहिती पुढे येत आहे.रोशन हा गाडी चालक असल्याने कामात व्यस्थ राहायचा तो घरच्यांना वेळ देऊ शकत नव्हता. आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही.

स्वातीच्या परिवाराला घटनेची माहिती दिली.असून वडील जळगाव येथे राहत असल्यामुळे लॉकडाऊन मध्ये येण्याची परवानगी घ्यावी लागली.स्वातीच्या वडीलानी पीएमकरिता थांबविले अशी माहिती आहे. पुढील तपास गिट्टीखदान पोलिस करीत आहे.