वाडीतील स्वस्त धान्य दुकानात धान्य वाटपात(भेदभाव) - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०४ एप्रिल २०२०

वाडीतील स्वस्त धान्य दुकानात धान्य वाटपात(भेदभाव)

संचारबंदीचे उल्लंघन:पुतणा मावशीचा व्यवहार  
महीलांसोबत अवाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार  
स्वस्त धान्य दुकानदाराचे गर्दीवर नियंत्रण नाही 
नागपूर : अरूण कराळे
संचारबंदी आणि लॉक-डाऊनमुळे गरीब सर्वसामान्य नागरिकांवर उपाशी राहण्याची वेळ येऊ नये म्हणून राज्यशासनाने प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना त्यांचा प्रत्येक महिन्यात मिळणारे नियमित राशन वाटप सुरू केले.

 वाडीतील प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात एकुण ६५० लाभार्थी असुन  तर काही  स्वस्त धान्य दुकानात लाभाथ्योंना शिवीगाळ केल्याचा प्रकार वाढत आहे . संचार बंदीमुळे वाडीतील गरीब सामान्य जनता आर्थिक तंगीचा सामना करीत आहे अश्या परिस्थिती जीवन जगण्याकरिता प्रत्येकाला अन्नधान्याची गरज आहे आणि ती शासकीय स्वस्त धान्य दुकातून माफक दरात उपलब्ध व्हावे अशीच सामान्याची आस आहे. 

परंतु राशन दुकानदार देण्यास नकार देत आहेत. शासकीय योजनेनुसार अंत्योदय व प्राधान्य या लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती ५ किलोग्रॅम तांदूळ मोफत देण्याची योजना असून सुद्धा दुकानदार देत नाही. राशन दुकानदाराने दोन्ही वेळी प्रत्येकी ४ - ४ घंटे दुकान उघडे ठेवावे असे आदेश असून सुद्धा काही दुकानदार  सकाळी  १० ते १२  या वेळातच दुकान सुरू ठेऊन फक्त  ३५ ते ४० लाभार्थ्यांना धान्य वाटप करीत आहे बाकी कार्डधारकांना या वेळानंतर वापस पाठवीत आहे.

असा आरोप चंद्रशेखर देशभ्रतार यांनी खबरबातशी बोलतांना  केला आहे. दत्तवाडीतील जिंदल पब्लीक स्कूल जवळील स्वस्त धान्यदुकानातील मालकाने अवाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप सुनीता लिमकर ,नंदीनी विलोणकर ,विद्या देशभ्रतार ,सोनु भुजाडे या महीलांनी  केला आहे . 
काही स्वस्त धान्य दुकानात नागरीकही गर्दी करीत असुन सोशल डिस्टिक्सन पाळत नसल्यामुळे संचारबंदीचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येते .

प्रतिक्रिया 
दुकान मालक 
जिंदल पब्लिक स्कूल जवळील स्वस्त धान्य दुकान मालकांना विचारले असता . महीलांना शिवीगाळ करण्याचा प्रकार केला नसल्याचे सांगीतले . या महीलांनी  याच दुकानातून धान्य व इतर माल  सुद्धा नेले आहे .