नागपूर : वाडी वेणा जल शुद्धीकरण केंद्र परिसरात आग - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२६ एप्रिल २०२०

नागपूर : वाडी वेणा जल शुद्धीकरण केंद्र परिसरात आगनागपूर : अरुण कराळे
वाडी नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या वेणा नगर टेकडीवर असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात रविवार २६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली.

वेणा जलाशयातून येणाऱ्या पाण्याचे वाडीतील वेणा नगर येथे शुद्धीकरण केंद्रात शुद्धीकरण होऊन आठवामैल ,दवलामेटी,डिफेन्स,वाडी परिसरातील जवळपास दररोज ३ लाख लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा करीत असते.मागील वर्षी केंद्राच्या परिसरातील खाली असलेल्या जागेत वनीकरण करण्यात आले आहे .

आजूबाजूला छोटी-छोटी झुडपे तसेच पानाचा पालापाचोळा असून याच परिसरातील टेकडीच्या खालच्या बाजूला देवीचे मंदिर असून या मंदिरात असामाजिक प्रवृत्तीच्या लोकांचा वावर असून सरास अवैध प्रकार घडत असल्याची माहिती पुढे येत आहे.तसेच जलशुद्धीकरण केंद्राची संरक्षण भिंत अनेक जागेवरून तुटल्याने कोणीही सहज आत शिरकाव करू शकतो.याबाबत संबंधीत विभागाने वरिष्ठांकडे तक्रारी केल्या असतांनाही काहीही उपाययोजना केली नाही.

याच परिसरात वेणा जलाशयाचे अधिकारी गजानन गटलेवार यांना राहत्या घरून दिसताच वाडी पोलीस स्टेशन ,अभियंता प्रदीप वानखेडे व नगर परिषद वाडी येथील अग्निशामक विभागाला माहीती देताच अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी उपाय योजना करीत आगीवर नियंत्रण आणून परिसरात पाणी पुरवठा करणारी लाखो रुपयांची प्लास्टिक पाईप खाक होण्यापासून वाचविली.


आगीचे नेमके कारण समजले नसले तरी परिसरात असलेला असामाजिक प्रवृत्तीच्या वावर असून यातील कुणीतरी सिगारेट , बिडीचा जळता तुकडा किंवा माचीसची काडी टाकल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.भविष्यातील मोठी दुर्घटना किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टिकोनातून रात्री पोलीस गस्त व पक्क्या मजबूत संरक्षण भिंतीचे बांधकाम संबंधित विभागाने करण्याची मागणी जोर पकडत आहे.