सॅनिटायजर लावून दिवे लावू नका अन्यथा घडू शकतो अनर्थ - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०४ एप्रिल २०२०

सॅनिटायजर लावून दिवे लावू नका अन्यथा घडू शकतो अनर्थ

डॉ. नितीन राऊत यांचे जनतेला आवाहन

नागपूर:
कोरोनाच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला हाताला सॅनीटायजर लावून 5 एप्रिल रोजी 9 वाजता 9 मिनिटे लाईट बंद करून दिवे लावा असे म्हटले आहे. मात्र हाताला सॅनीटायजर लावून दिवे व मेणबत्ती लावल्यास त्यात असलेल्या अल्कोहमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सॅनिटायजर लावून दिवे लावू नका, सावधगिरी बाळगा असे आवाहन ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी जनतेला केले आहे.

एकाचवेळी सर्वत्र लाईट बंद केल्यास देश अंधारात बुडण्याचा धोका आहे तर दुसरीकडे अतिउत्साहाच्या भरात जनतेच्या जिवाशी खेळ होऊ घातला आहे अशी टीका देखील डॉ. राऊत यांनी केली आहे.

त्यामुळे राऊत यांनी सर्वांना आवाहन केले आहे की, जनतेने लॉकडाउनचे पालन करावे, सोशल डिस्टंसचे भान ठेवावे, गर्दी करू नये,कोणत्याही परिस्थितीत उत्सवाचे स्वरूप येणार नाही याची दक्षता घ्यावी.