शिक्षिका सुजाता भानसे यांनी स्वतः मास्क तयार करून घरोघरी वाटप केले सुरू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२३ एप्रिल २०२०

शिक्षिका सुजाता भानसे यांनी स्वतः मास्क तयार करून घरोघरी वाटप केले सुरू


नागपूर : अरूण कराळे 
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू आहे.अशा परीस्थितीत समाजसेवा करणे अतिशय कठिण बाब आहे. अशाही परिस्थितीत सोनेगाव निपाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सुजाता भानसे यांनी कापडापासून स्वतः मास्कची शिलाई करुन गरजू व गरीब आवश्यकता असलेल्या लोकांना घरी जाऊन सोशल डिस्टन्सिंग पाळून मास्कचे वितरण करीत आहे. 

शासकीय आदेशाचे पालन करीत सर्वांना प्रत्येक वेळी मास्क लावण्यास विनंती करीत आहे त्यामुळे स्वतःचे व इतरांचे प्राण संकटातून आपण वाचवू शकणार. कोरोना वायरस पासून बचाव करण्यासाठी लाँकडाउनचे पालन करणे का आवश्यक आहे स्वतः चे या रोगापासून बचाव करण्यासाठी रोज सकाळी उठून व्यायाम करावे, दिवसभर भरपूर पाणी प्यावे, कुठल्याही अफवांना बळी पडू नये तसेच डोकं दुखणे, सर्दी, खोकला, ताप,पोटासंबंधी समस्या, श्वसनासंबंधीत समस्या निर्माण झाल्यास ,उल्टी,पचनासंबंधी समस्या लक्षात येताच डाँक्टरांशी संपर्क साधावा, तसेच साबनाने वारंवार हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे का जरूरी आहे हे समजावून सांगत आहे व जनजागृती करीत आहे ,

 सध्याच्या परिस्थितीत मास्क हा जीवनाचा अभिन्न अंग बनलेले आहे. सुजाता भानसे यांनी आजपर्यंत १००० च्या जवळपास मास्क गरजू नागरीक तसेच किराणा दुकानात येणाऱ्या ग्राहकांना नि:शुल्क मास्क दिले आहे .