महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेतर्फे मुख्यमंत्री कोविड-१९ सहायता निधीसाठी २ लाखाची मदत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२९ एप्रिल २०२०

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेतर्फे मुख्यमंत्री कोविड-१९ सहायता निधीसाठी २ लाखाची मदत

नागपूर/प्रतींनिधी:
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेतर्फे मुख्यमंत्री कोविड-१९ सहायता निधीसाठी २ लाख रुपयांचा धनादेश ऊर्जा मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितीन राऊत, यांच्या हस्ते जिल्हाधिकारी . रविंद्र ठाकरे, यांचेकडे सुपूर्द करण्यात आला.

 यावेळी पोलीस आयुक्त भूषण कुमार उपाध्याय, हे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते. धनादेश हस्तांतरित करते वेळी केंद्रीय कार्याध्यक्ष प्रविण काटोले, , पतसंस्था सचिव श्री. निलेश जुमळे, आणि नागपूर परिमंडळ सचिवश्री. अतुल राऊत, हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या वेळी सोशल डिस्टन्सिंग चे पूर्ण पालन करण्यात आले.

या अगोदर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेतर्फे एक लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री कोविड-१९ सहायता निधीसाठी देण्यात आला असून. अधिकारी संघटनेकडून ३ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.