MSEB च्या कर्मचाऱ्यांनी वर्गणी काढून गरिबांच्या घरात पोहचवल अन्न-धान्य - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ एप्रिल २०२०

MSEB च्या कर्मचाऱ्यांनी वर्गणी काढून गरिबांच्या घरात पोहचवल अन्न-धान्य

नागपूर/प्रतिनिधी:
सध्या कोरोना विषाणूंचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्वत्र बंद असताना हातावर पोट असलेल्या मजूरांना अन्न-धान्याची मदत करीत महावितरणच्या कर्मचार्‍यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला.वीज ही अत्यावश्यक सेवा आहे.सध्याच्या परिस्थितीत महावितरणचे कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत.पण सर्वत्र बंद असताना अनेकांना आपले पोट कसे भरायचे याची चिंता लागली आहे. अशा लोकांना मदत करण्यासाठी महावितरणच्या महाल विभागातील कर्मचारी समोर आले.या कर्मचार्‍यांनी वर्गणी गोळा करून अन्न-धान्य खरेदी केले.यात तांदूळ,आटा, तुर डाळ,तेल,कांदे, बटाटे साहित्य कामठी परिसरात जुनी कामठी,गोरा बाजार,आजनी, कळमना परिसरात असलेल्या मजुरांना याचे वाटप केले.या कामी अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रसन्न श्रीवास्तव, मंगेश कहाळे, सहायक अभियंता योगेश इटनकर, श्रीकांत बहादुरे, मनिष वाकडे, वसीम अहमद यांनी पुढाकार घेतला.