त्या माऊलीच्या मदतीसाठी उडिया मोहल्लात पोहचले खासदार धानोरकर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१० एप्रिल २०२०

त्या माऊलीच्या मदतीसाठी उडिया मोहल्लात पोहचले खासदार धानोरकर

कोणाचाही उपासमारीने मृत्यू होता कामा नये 
चंद्रपूर/प्रतिनिधी:

 सद्या कोरोना मुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. प्रशासनाने लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे हातावर आणून पानावर खानाऱ्यांचे हाल होत आहे. उडिया मोहल्यातील सत्तर वर्षीय तुळजाबई रासेकरच्या जीवन संघर्षाची बातमी प्रकाशित होताच चंद्रपूर खासदार बाळू धानोरकर यांनी तात्काळ दखल घेत माऊलीच्या राहत्या घरी भेट दिली. 

याच सोबत परिसरातील तुळजाबाई याच्या सारख्या अनेक महिलांची देखील त्यांनी तात्काळ दाखल घेत त्यांना धान्य व औषधोचारासाठी आर्थिक मदत केली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय, रामू तिवारी यांची उपस्थिती होती.

 कोरोनामुळे हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे बेहाल होत आहे. सर्वत्र मदत करण्यात येत आहे.परंतु काही भाग वंचित राहू न देता सर्वांनी असा प्रकार गंभीर दिसून येताच मदतीचे आव्हाहन केले आहे. उपासमारीने मृत्यू होता कामा नये.त्यामुळे जसे जमेल तशी मदत प्रत्येकाने करा असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.

(व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा)