#Breaking News आमदार समीर मेघे बसले आंदलनाला:वानाडोंगरीतून क्वारंटाईन झालेले जोपर्यंत हटणार नाही तो पर्यंत मी येथून हटणार नाही - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२४ एप्रिल २०२०

#Breaking News आमदार समीर मेघे बसले आंदलनाला:वानाडोंगरीतून क्वारंटाईन झालेले जोपर्यंत हटणार नाही तो पर्यंत मी येथून हटणार नाही

नागपूर:अरूण कराळे:
नागपूरातील सतरंजीपुरा येथील कोरोना विषाणू संसर्गित असल्याचा संशय असलेले जवळपास १२६ नागरीक  वानाडोंगरी येथील समाजकल्याण विभागाचे मुलांचे शासकीय वसतिगृह येथे आणून ठेवण्यात आले आहेत. जोपर्यंत वानाडोंगरी( हिंगणा ) येथून  क्वारंटाईन झालेले नागरीक  हटणार नाही तो पर्यंत मी आपल्या कार्यालयाच्या परिसरातून  हटणार नाही . अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांना हिंगणा विधानसभेचे आमदार समीर मेघे यांनी दिले . जिल्हाधिकारी परिसरातच आमदार समीर मेघे ठाण मांडून बसले आहे. 

वानाडोंगरी परिसरात दाट लोकवस्ती असून बाजूलाच औद्योगिक क्षेत्र व  कामगार वास्तव्य करीत असणाऱ्या इसासणी, नीलडोह डिगडोह इत्यादी दाट लोकवस्तीच्या वसाहत आहेत.

संशयित रुग्ण ज्या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत तेथे क्वारंटाईन  नियमाप्रमाणे सुविधांचा अभाव आहे . त्यामुळे भरवस्तीत असणाऱ्या वसतीगृहामधून हटवून इतरत्र त्यांना न्यावे असेही निवेदनातून स्पष्ट केले .