कारंजा पोलिसांची गावठी दारु अड्ड्यावर धाड:१ लाख ४० हजार रुपयाची दारु नष्ट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

११ एप्रिल २०२०

कारंजा पोलिसांची गावठी दारु अड्ड्यावर धाड:१ लाख ४० हजार रुपयाची दारु नष्ट

कारंजा/घाडगे:उमेश तिवारी:
सध्या राज्यात लाॅकडाऊन असल्यामुळे देशी-विदेशी दारु मिळत नसल्याने गावठी दारुच्या मागणीत खुप प्रमाणात वाढ झाली. त्यामूळे काही अवैद्य धंदेवाल्यांन्नी जंगली भागाचा सहारा घेवुन तिथे गावठी दारुचे कारखाने सुरू केलेत. कन्नमवारग्राम च्या शिवारात अशाच एका गावठी दारुच्या अड्ड्यावर कारंजा (घा.) पोलिसांनी धाड टाकून १ लाख ४० हजार रुपयाची दारु नष्ट केली.

कन्नमवारग्राम च्या शिवारातील जंगलात अवैध दारू तयार केली जात असल्याची माहिती कारंजा पोलीस स्टेशन ला मिळाली. सदर माहिती मिळताच उप विभागीय पोलिस अधिकारी श्री. मैराळे, कारंजा पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री. राजेंद्र शेटे, उपनिरीक्षक चाहेर यांचे मार्गदर्शनात बीट जमादार किशोर कडु, गुड्डू थूल, हर्षवर्धन मून यांनी कन्नमवारग्राम च्या जंगलात गावठी दारु अड्ड्यावर धाड टाकुन एकुण एक लाख चाळीस हजार रुपयांची गावठी दारू व मुद्देमाल कार्यवाही करुन नष्ट केला. 

गावठी दारू तयार करताना पकडले गेलेले आरोपी किशोर कोहळे, चंद्रकला वाघधरे दोन्ही रा. कन्नमवारग्राम यांचेवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत कार्यवाही करण्यात आली. कन्नमवारग्राम चे पोलिस पाटील राजू चौबे व भिवापूरचे पोलिस पाटील अवथळे यांची पोलिसांना मदत मिळाली.