जोरगेवार म्हणाले आमदार निधीतून पैसे देण्यास मी तयार पण,गरजूंच्या भोजनाची व्यवस्था मनपाने करावी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०२ एप्रिल २०२०

जोरगेवार म्हणाले आमदार निधीतून पैसे देण्यास मी तयार पण,गरजूंच्या भोजनाची व्यवस्था मनपाने करावी


चंद्रपुर/प्रतींनिधी:
कोरोना विषाणूच्या लढ्यात शासन प्रशासनाला चंद्रपूरकर कौतूकास्पद सहकार्य करत आहे. अशात चंद्रपूकरांच्याही अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. संचारबंदीमूळे अणेकांवर उपासमारीची वेळ आढावण्याची शक्यता बढावत आहे. काही सामाजीक संस्था व चंद्रपूरातील दानशूर गरजुंच्या मदतीला समोर आले आहे. 

मात्र यंत्रणे अभावी शेवटच्या गरजूपर्यंत पोहचण्यात अडचणी येत आहे. त्यामूळे आता चंद्रपूर शहर महानगरपालिकेने पुढाकार घेत आपल्या विस्तारित यंत्रणेचा वापर करुन गरजुंच्या भोजनाची सोय करत शेवटच्या गरजू पर्यंत मदत पोहचवावी. या सेवेच्या कार्यात लागणारे पैसे मी आमदार निधीतून देण्यासठी तयार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले असून तसा प्रस्तावही आ. जोरगेवार यांनी मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्यापुढे समोर ठेवला आहे.

चंद्रपूर 71 विधानसभा मतदार संघ हा औदयोगीक जिल्हातील केंद्रस्थान असल्यामूळे या मतदारसंघात कामगारांची संख्या अधिक आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमूळे या कामगारांना अडचणींचा सामाना करावा लागत आहे. 

विशेष म्हणजे यातील अणेकांना आता भोजनासाठीचा प्रश्न उद्भवत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढावण्याची शक्यता बळावली आहे. अणेक सामाजीक संस्थांसह चंद्रपुरातील दानशूरांच्या माध्यमातून गरजूपर्यंत भोजन पोहचवीण्याचा प्रामाणीक प्रयत्न सुरु असला तरी शेवटच्या गरजूपर्यंत पोहचने शक्य होत नसल्याचे निर्दशनास येत आहे. त्यामूळे महानगरपालिकेने मानूसकीच्या भावणेतून आता भोजन वाटपाची जबाबदारी स्वता घ्यावी, महानगरपालिकेची यंत्रणा मोठी असून प्रत्येक वार्डात मनपाची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. 

घंटागाडीच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत महानगरपालिका पोहचू शकते. त्याच बरोबर आशा वर्करचे मोठे जाळे मनपा अतंर्गत शहरात कार्यरत आहे. या विस्तारीत यंत्रणेच्या माध्यमातून महानगरपालिका शेवटच्या गरजूपर्यंत सहज पोहचू शकते. त्यामूळे प्रत्येक गरजूंना भोजन वाटप करण्याची जबाबदारी आता चंद्रपूर महानगर पालिकेने घ्यावी, यात निधीची गरज पडल्यास जिल्हा प्रशासन, सामाजिक संस्था व मी आमदार निधीतून मदत करण्यास तयार असल्याची ग्राव्ही आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे.

 तसा प्रस्तावही आ. जोरगेवार यांनी मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्यापूढे ठेवला आहे. विशेष म्हणजे सध्या अनेक सामाजीक संस्थांसह आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने शहरातील गरजुंपर्यंत भोजन पॉकेट पाठवीले जाते आहे. मात्र ही सेवा आणखी विस्तारीत करण्याच्या हेतूने आता यात महानगर पालिकेने पूढाकार घेण्याचे आवाहणच नव्हे तर आमदार निधीतून मदत करण्याची तयारीही सुद्धा आमदार किशोर जोरगेवार यांनी दर्शवली आहे.