नागपुरात कोरोंना पेशंटचा आकडा फुगला:एकाच दिवशी सापडले 17 कोरोंना बाधित रुग्ण;नागपुरचे अनेक प्रभाग पोलिसांकडून सील - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१३ एप्रिल २०२०

नागपुरात कोरोंना पेशंटचा आकडा फुगला:एकाच दिवशी सापडले 17 कोरोंना बाधित रुग्ण;नागपुरचे अनेक प्रभाग पोलिसांकडून सील

नागपूर/ललित लांजेवार:
राज्याची उपराजधानी नागपुर आता कोरोना  हॉट स्पॉट म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.  रविवार दिवस नागपूरकरांसाठी ब्लॅक संडे ठरला. कारण एकाच दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत 17 जणांना, तर सोमवारी सकाळी आणखी 5 रुग्णांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे एकट्या नागपुरातील कोरोना बाधितांचा 49  वर जाऊन पोहचला आहे.हा विदर्भच नव्हे तर मध्य भारतातील करोना बाधितांचा उच्चांकी आकडा ठरला आहे.

लवकरच नागपुर 50 क्रॉस करेल असे या चित्रातून स्पष्ट होत आहे. रविवारी वाढलेल्या या आकड्यांनी नागपूरकरांच्या चिंतेत भर पाडली आहे.
विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात दगावलेल्या सतरंजीपूरा येथील कोरोना बाधिताच्या परिवाराशी जुडला आहे. यात  ४२ वर्षीय महिला आणि १४ वर्षीय मुलगा १५ वर्षीय मुलगी ही सतरंजीपूरा येथील रहिवासी आहेत.रविवारी सापडलेल्या 17 रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरू आहे.  


मोमिनपुरा, सतरंजीपुरा हे भाग आता करोनाबाधितांच्या बाबतीत हॉटस्पॉट ठरत आहेत. शिवाय रविवारी पॉझिटिव्ह आलेल्यांपैकी अनेक जण हे आमदार निवासातल्या विलगीकरनातले होते.रवीवारच्या रात्रीच्या या घटने नंतर नागपुरातील मोमिंनपुरा,चितेश्वर वार्ड,मासुरकर चौक,सतरंजीपुरा परिसर पोलिसांकडून सील करण्यात आला आहे. 

रविवारी आढळलल्या पहिल्या १४ रुग्णांमध्ये चार जबलपूरचे, एक कामठी येथील आणि उर्वरित ९ नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील रुग्ण आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढल्याने आपणा सर्वांना आता आणखी जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे कुणीही विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
Image
सह पोलीस आयुक्त यांनी सतरंजीपुरा सिलिंग पॉईंट येथे येथे पायदळ फिरून माहिती घेतली तसेच त्या भागात सर्वे करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांचेसह हितगुज करून माहिती घेतली व पोलिस कर्मचारी यांना भेट देऊन मार्गदर्शन केले

यासंबंधी माहिती देताना मनपा आयुक्तांनी सांगितले की, सर्व १४ ही रुग्णांना यापूर्वीच 'क्वारंटाईन' करण्यात आले होते. त्यांची चाचणी घेतल्यानंतर रविवारी ते कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी पूर्वीच क्वारंटाईन केल्यामुळे त्यांच्यापासून इतरत्र कोरोना पसरण्याची भीती नाही. दिल्ली येथून प्राप्त माहितीच्या आधारे २५१ व्यक्ती आणि त्यांच्या संपर्कात आलले ३० अशा एकूण २८१ व्यक्तींना 'क्वारंटाईन' करण्यात आले होते. दिल्ली येथून आलेल्यांमध्ये ८ जण मूळचे जबलपूरचे आहेत. या आठ जणांपैकी चौघे कोरोनाग्रस्त असल्याने निष्पन्न झाले आहे.
कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येचा आधार घेत राज्य शासनाने केलेल्या विभागणीनुसार नागपूर जिल्हा हा रेड झोनमध्ये येतो. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने आता नागपूरकरांचीही चिंता वाढली आहे.   सदर रुग्ण राहत असलेला सतरंजीपुरा, मोमीनपुरा परिसर पूर्णतः सील करण्यात आला आहे. तर काही रुग्ण काटोल रोड व कामठी रोड भागातील असून तो परिसरही सील करण्यात येत आहे. 
संसर्ग पसरू नये यासाठी मनपातर्फे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी मनपाने टीम निर्धारित केल्या असून १४ दिवस मनपाची चमू निर्धारित परिसर, तेथील घरे आणि लोकसंख्या या सर्वांची माहिती घेऊन सर्वेक्षण करणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी सर्वेक्षण करणा-या चमूला व मनपा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.