चिमुकल्यांची मदत:खाऊच्या पैशातून चिमुकल्यांनी केली 5 हजार रूपयांची मदत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१५ एप्रिल २०२०

चिमुकल्यांची मदत:खाऊच्या पैशातून चिमुकल्यांनी केली 5 हजार रूपयांची मदत


नागपूर : अरूण कराळे:
येथील वसंत विहार मधील नंदकिशोर गोरे यांचा बारा वर्षाचा मुलगा पियुष व पंधरा वर्षाची मुलगी कशीष यांनी खाऊचे जमा झालेले पाच हजार रुपये वाडी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक यांना दिले.परंतु पोलीस निरीक्षक राजेंन्द्र पाठक यांनी पैसे न स्वीकारता या पैशातून तुम्हीच अन्न धान्य विकत घेऊन गरीबांना मदत करा असे सांगीतले . 

पियुष आणि कशिष यांनी धान्य व किराणा घेऊन गरजूंना वाडी पोलीस स्टेशनमध्येच वाटप केले.समाजाकरीता आपण काही तरी केले पाहिजे या भावनेतून खाऊचे पैसे देण्याचा निर्णय माझ्या मुलांनी घेतला होता मला ही त्याचा आनंद झाला अशी प्रतिक्रिया मुलांचे वडील नंदकिशोर गोरे यांनी दिली . तसेच युवराजसिंग फाउंडेशन येथे ऑनलाईन १०० रूपयाची मदत गरजूंकरिता पाठविली आहे . 

चांगल्या उपक्रमाबद्दल पियुष व कशिषचे वाडीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक ,पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी कौतूक केले .