कोरोना VRDL लॅब हिमोग्लोबीनोपॅथी सेंटर चंद्रपूरला द्या;हंसराज अहीर यांची ICMR महासंचालकांना पत्र - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२५ एप्रिल २०२०

कोरोना VRDL लॅब हिमोग्लोबीनोपॅथी सेंटर चंद्रपूरला द्या;हंसराज अहीर यांची ICMR महासंचालकांना पत्र

अमृतसर हमले पर केंद्रीय मंत्री ...
चंद्रपुर/प्रतींनिधी:
कोवीड - 19 विषाणूचे संकट संपूर्ण देशात असतांना दुर्देवाने महाराष्ट्रात कोरोना पाॅझीटीव्ह ची संख्या सर्वात अधिक असून महाराष्ट्र व अन्य राज्यातील कोवीड चाचणी करण्याकरिता सद्यास्थितीत सुरू असलेल्या व्हिआरडीएल लॅब वरती अधिक बोझा वाढत आहे हे सर्वश्रूत आहे. असे असतांना चंद्रपूर येथे पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रयत्नांतून सुरू असलेले हिमोग्लोबीनोपॅथी सॅटेलाईट सेंटर येथे व्हिआरडीएल लॅब सुरू करा अशी मागणी खुद्द हंसराज अहीर यांनी भारतीय वैद्यकीय संषोधन परिशदेच्या (आयसीएमआर) महासंचालकांना पत्राद्वारे केली आहे.

सुदैवाने चंद्रपूर जिल्हयात पाॅझीटीव्ह रूग्ण नसून जिल्हा ग्रीन झोन मध्ये समाविष्ट असल्याने चंद्रपूर येथे सुरू असलेले हिमोग्लोबीनोपॅथी सॅटेलाईट सेंटर हे नजीकच्या यवतमाळ व गडचिरोली जिल्हयातील कोवीड ची चाचणी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त व सोईस्कर ठरू शकते असेही पुर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे. चंद्रपूरात काही वर्षांपासून सुरू असलेल्या या हिमोग्लोबीनोपॅथी सॅटेलाईट सेंटर मध्ये अनुभवी व ज्ञात कर्मचारी सदस्य असल्याचेही अहीर यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

कोवीड चे सर्वांधिक रूग्ण महाराष्ट्रात आहे व नजिकच्या नागपूर व यवतमाळ येथे दिवसेंदिवस रूग्णांची वाढ होत आहे. असे असतांना नागपूर, यवतमाळ, गडचिरोली व अन्य जिल्हयांतील चाचण्या करण्यासाठी चंद्रपूर येथील हिमोग्लोबीनोपॅथी सॅटेलाईट सेंटर हा कोवीड चाचणीसाठी एक उत्तम पर्याय असल्याचे हंसराज अहीर यांनी सांगत येथे व्हिआरडीएल लॅब सुरू करण्यासाठी त्वरीत कार्यवाही करण्याची मागणी अहीर यांनी केली आहे. असे झाल्यास कोवीड रूग्णांच्या चाचणीमध्ये अधिक वेग तर येईलच सोबतच कोवीड वर मात करण्यासाठी ही भरीव मदत होईल असा विश्वास यावेळी हंसराज अहीर यांनी व्यक्त केला आहे.