चंद्रपूर जिल्ह्यात तीन महिन्यांचा वीज बिल माफ करा:भाजयुमो वि.आ चे जिल्हाध्यक्ष मोहन कलेगुरवार यांची मागणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२२ एप्रिल २०२०

चंद्रपूर जिल्ह्यात तीन महिन्यांचा वीज बिल माफ करा:भाजयुमो वि.आ चे जिल्हाध्यक्ष मोहन कलेगुरवार यांची मागणी

भारतीय जनता युवामोर्चा वि.आ आघाडी राजुरा तर्फे तहसीलदारांमार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांना निवेदन
चंद्रपूर/प्रतिनिधी:
देशात सध्या कोरोना या महामारी चे फार मोठे संकट फोफावले आहे.या महामारी ला रोखण्यासाठी उपायोजना म्हणून केंद्र व राज्य सरकार कडून 3 मे पर्यंत लॉक डाऊन वाढविण्यात आले आहे.देशभरातील सर्व व्यवहार ठप्प झाले असून हातावर आणून पानावर खाणाऱ्या लोकांची चांगलीच पंचायत झाली आहे, मजूर,लहान व्यापारी,शेतकरी वर्ग फार मोठ्या आर्थिक अडचणीत आहे.कुठलाही रोजगार नाही.हा वर्ग लॉक डाऊन च्या परिस्थितीत घरीच बसून या महामारी चा सामना करीत आहे. 

अश्या स्थितीत आर्थिक संकटात सापडलेल्या या सर्व वर्गांना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कडून येणारा तीन महिन्याचा विद्युत बिलाचा भरणा माफ करण्यात यावा अशी मागणी आज दिनांक 21/04/2020 रोजी मंगळवार ला भारतीय जनता युवामोर्चा विध्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहन कलेगुरवार यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे विनंती केली त्यावेळी भाजयुमो वि.आ तालुका अध्यक्ष राहुल थोरात, भाजयुमो वि.आ तालुका महामंत्री छबिलाल नाईक, भाजयुमो वि.आ शहर अध्यक्ष सुधिर अरकिलवार व भाजयुमो शहर महामंत्री अजयकुमार श्रीकोंडा उपस्तिथ होते.