लॉकडाऊनमुळे नागपुरात उभ्या असलेल्या ट्रकचे टायर आणि स्टेपणी चोरीला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२५ एप्रिल २०२०

लॉकडाऊनमुळे नागपुरात उभ्या असलेल्या ट्रकचे टायर आणि स्टेपणी चोरीला

नागपूर:अरूण कराळे:
संचारबंदी असल्यामुळे वाडी ,वडधामना परिसरात हजारोच्या संख्येने ट्रक रस्त्यावर उभे आहेत . हीच संधी साधत चोरट्यांनी ट्रकच्या डिस्कसहीत असलेल्या टायरवर लक्ष साधत डिस्कसहीत टायर चोरीला गेलेली घटना वडधामना परिसरात शनिवार २५ एप्रिल रोजी घडली . 

पोलीससुत्राच्या माहीतीनुसार वडधामना ट्रॉन्सपोर्ट क्षेत्रात पार्क केलेला ट्रक क्रमांक एमएच ४३ बीपी २६५१ चे चारही डिस्कसहीत टायर चोरट्यांनी पळविले आहे.त्यामुळे वाडी, वडधामना क्षेत्रातील ट्रक मालकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा ट्रक कृष्णा लॉजिस्टिक सॉल्यूशन अहमदनगर मधील असल्याचे सांगण्यात येत आहे.व्यवस्थापक राधेश्याम बिशनोई यांनी वाडी पोलिसात लिखित तक्रार दिली आहे.उभ्या असलेल्या ट्रकमध्ये सहा टायर डिस्क लागले होते.
ज्यात चारही टायर सह डिस्क काढून गाडीच्यामागे असलेल्या दोन चाकावर गाडी उभी आहे.राधेश्याम बिसमोई यांनी सांगितले की गाडी सीसीटीव्ही कॅमेरे च्या फक्त ५० फूटच्या अंतरावर उभी आहे. तसेच वडधामन्यात डिझेल चोरणारी ,आरसे काढणारी टोळी असून त्यामध्ये टायर चोरणाऱ्या टोळीचा नंबर लागला आहे. चार टायर डिस्कची किंमत अंदाजे जवळपास एक लाख रुपये पर्यंत असून सीसीटीवी फुटेज काढण्यात आले आहे. ट्रान्सपोर्ट क्षेत्रात उभे असलेल्या ट्रकची सुरक्षा मिळाली पाहिजे अशी मागणी ट्रॉन्सपोर्ट ओनर असोसिएशन चे अध्यक्ष महेंद्र शर्मा यांनी वाडी पोलीस स्टेशनमध्ये केली आहे.