फेटरीत दिव्यांगांना मोफत किराणा व प्रत्येकी 8 हजार रुपयांचा धनादेश वाटप - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२५ एप्रिल २०२०

फेटरीत दिव्यांगांना मोफत किराणा व प्रत्येकी 8 हजार रुपयांचा धनादेश वाटप

नागपूर/अरुण कराळे:
नागपुर तालुक्यातील फेटरी ग्रामपंचायतीकडून दिव्यांगांना जीवनावश्यक किराणा सामानाचे शुक्रवार २४ एप्रिल रोजी मोफत वाटप करण्यात आले. ग्राम पंचायतच्या एकूण वार्षिक उत्पन्नाच्या पाच टक्के निधी दरवर्षी दिव्यांगांना वितरित करण्यात येतो. कोरोना विषाणूच्या आजारामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर फेटरी गावातील एकूण १९ दिव्यांगाना जीवनावश्यक किराणा वस्तूंचे वाटप करण्यात आले. 

यात प्रत्येकी पाच किलो तांदूळ व गव्हाचे पीठ, दोन किलो सोयाबीन तेल, प एक किलो तूर डाळ ,आणि साखर तसेच तिखट, हळद, धने पावडर, मसाला पावडर, चहापत्ती, मीठपुडा, साबण आदी साहित्याचा समावेश आहे. तसेच ग्रामपंचायत कडून सर्व दिव्यांगांना प्रत्येकी आठ हजार रुपये मदतनिधी धनादेशाद्वारे देण्यात आला आहे.

 गावातील एकाही नागरिक, मजूर व दिव्यांगावर उपासमारीची पाळी येऊ नये म्हणून सरपंच धनश्री ढोमणे, उपसरपंच आशिष गणोरकर, ग्रामसेवक नितीन वाकोडे, सर्व ग्रा. पं. सदस्य आणि कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत.