वाडीत जय श्री परशुराम जयंतीनिमीत्य धान्य व किराणा साहीत्याचे वाटप - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२५ एप्रिल २०२०

वाडीत जय श्री परशुराम जयंतीनिमीत्य धान्य व किराणा साहीत्याचे वाटप

अखिल भारतीय ब्राम्हण समाजाचा उपक्रम
नागपूर/अरूण कराळे:
तालुक्यातील वाडी येथील गजानन सोसायटी मधील श्री संत गजानन महाराज मंदीराच्या प्रांगणात अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ नागपूर व वाडी तर्फे जय श्री परशुराम यांच्या जयंतीनिमित्त शनिवार २५ एप्रिल रोजी अन्नधान्य व किराणा साहीत्याचे तयार केलेले १०० किट गोरगरीब व गरजू नागरीकांना वाडी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक व पोलीस उपनिरीक्षक श्रीनाथ मिश्रा यांच्या हस्ते देण्यात आले . 
या तयार केलेल्या पॉकीटात दाळ, तांदूळ, तेल, मीठ, चहा पत्ती, साबून, बिस्कीट, पीठ, साखर, हळद व मिरची पावडरचा समावेश होता .वाटप करतांना अखिल भारतीय ब्राम्हण समाजाचे अँड. श्रीराम बाटवे ,अभिजीत जोशी,आशीष भट्टलवार ,राजेंद्र तिवारी, पंकज खिरवाडकर , किशोर पारखी ,नगरसेवीका कल्पना सगदेव ,वर्षा सिंगरू, विजय हरदास ,अनिल कुळकर्णी, राजेश महाजन आदींनी सहकार्य केले.