दवलामेटी येथे गरजूंना धान्य वाटप - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

११ एप्रिल २०२०

दवलामेटी येथे गरजूंना धान्य वाटप


नागपूर : अरूण कराळे:
कोरोना विषाणूच्या आजाराने धुमाकूळ घातल्यामुळे याचा दुष्परिणाम शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही दिसून येत आहे. मजुरी, कारखाने व छोटे-मोठे व्यवसाय ठप्प पडल्याने ग्रामीण गरीब व मजूर वर्गाची परिस्थिती सध्या हलाकीची झाली आहे. सामान्य नागरिक ,गरीब जनता उपासमारीने मरू नये यासाठी रेशन ,जेवण साहित्य पुरवून आपल्या सामाजिक बांधिलकीला जपत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. दवलामेटीचे उपसरपंच गजानन रामेकर यांच्या पुढाकाराने हिलटॉप कॉलनी व आसपास वार्डातील गरजूंना धान्य वाटप करण्यात आले .

कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी धार्मिक कार्यक्रमांवर सध्या बंदी आहे.त्यामुळे दरवर्षीप्रमाणे धार्मिक कार्यक्रम करण्याऐवजी गरजूंना परिसरातील दानधर्मी नागरिकांच्या सहयोगाने शेकडोंच्या संख्येत आलेल्या गरजूंना धान्य वितरित केले गेले. या कार्यक्रमात स्वच्छता व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांवर विशेष भर देण्यात आला.धान्य वितरणाची सुरुवात हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर मेघे व नागपूर ग्रामीणचे तहसीलदार मोहन टिकले यांच्या हस्ते करण्यात आले .

आयोजनासाठी सरपंच आनंदीबाई कपनीचोर,उपसरपंच गजानन रामेकर,संतोष पाठक, प्रदीप रोकडे, अजय जयस्वाल, ज्ञानेश्वर मोगरकर , राम लगड यांनी सहकार्य केले. यावेळी ग्रामविकास अधिकारी विष्णु पोटभरे,माजी सरपंच संजय कपनीचोर,निलेश भुयारकर,ग्रा.पं.सदस्य नितिन अडसड, रमेश गोमासे ,विशाल कुमरे,कपिल दरशिंगार, प्रशांत केवटे,ऋषिकुमार वाघ ,दिलीप वर्मा,नारायण खंडारे, राजेश चांदेकर,अशोक रामेकर,सारंग पाटील,निखिल हरणे, नूतन रहीले,राकेश तवाडे उपस्थित होते .