दवलामेटीत कोविड 19 "कंटाईनमेंट प्लॅन" प्रशिक्षण:एक सर्वेअर दररोज ५० कुटुंबाची भेट घेणार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१९ एप्रिल २०२०

दवलामेटीत कोविड 19 "कंटाईनमेंट प्लॅन" प्रशिक्षण:एक सर्वेअर दररोज ५० कुटुंबाची भेट घेणार


एक पर्यवेक्षक ५०० कुटुंबाची माहिती अद्यावत ठेवणार
नागपूर : अरूण कराळे:
तालुक्यातील दवलामेटी ग्रामपंचायत सभागृहात प्राथमिक आरोग्य केंद्र,व्याहाड अंतर्गत येणाऱ्या ग्राम पंचायत मधील नागरिकांच्या कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना व प्रत्येक कुटुंबापर्यंत संपर्क ठेवून आरोग्य विभागाला दैनंदिन माहिती पुरविण्यासाठी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, आरोग्य सेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका इत्यादींचे प्रशिक्षण शनिवार १८ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले.

प्रशिक्षणाला पंचायत समिती नागपूरचे गट विकास अधिकारी किरण कोवे, व्याहाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सत्यवान वैद्य यांनी कंटाईनमेंट प्लॅन बद्दल सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.

नागपूर ग्रामिण तालुक्यात एकही कोरोना संशयित व्यक्ती आढळून आलेला नसून फक्त २९ व्यक्ती परदेशात जाऊन आलेले असून त्यांना होम क्वारंटाईन केले असल्याची माहिती गट विकास अधिकारी किरण कोवे यांनी दिली. आयोजनासाठी ग्राम विकास अधिकारी विष्णू पोटभरे, विस्तार अधिकारी दिलीप कुहीटे, सुखदेवे इत्यादींनी परिश्रम घेतले.