चंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

चंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह


नागपुर/ललित लांजेवार:
39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशिया येथे काही लोकांसोबत गेला होता,त्यानंतर तो 22 मार्चला नागपूर येथे पोहोचला, या अगोदर इंडोनेशिया ते दिल्ली आणि दिल्ली ते नागपूर असा त्यांचा प्रवास होता. 

नागपूर येथे चेकिंग झाल्यावर त्याला MLA हॉस्टेल येथे  विलगिकरण करण्यात आलेले होते, व त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, तपासणीचा अहवाल आल्यानंतर हा रुग्ण पॉझिटिव आढल्याने खळबळ उडाली. आणि नागपुरात कोरोना बाधितांची एकूण संख्या 18 झाली.  विशेष म्हणजे ही व्यक्ती चंद्रपूर येथील असल्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे आता प्रशासनात चांगलीच खळबळ उडालेली आहे.चंद्रपूर जिल्ह्याचा नागरिक असणारा एक व्यक्ती विदेशातून आल्यापासून नागपूरला इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईन होता.  तो चंद्रपूरमध्ये आलाच नाही.  सदर व्यक्ती हा कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे वृत्त आहे. मात्र त्याचा सध्या चंद्रपूरशी संबध नाही 
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार