वाडी, दवलामेटीत दुषित पाण्याचा पुरवठा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१२ एप्रिल २०२०

वाडी, दवलामेटीत दुषित पाण्याचा पुरवठा


नागपूर : अरूण कराळे:
तालुक्यातील वाडी ,दवलामेटी परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधीकरण तर्फे पाण्याचा पाणी पुरवठा सुरू असून सध्या परिसरात दुषित पाण्याचा पुरवठा सुरू आहे.स्थानीक नागरीकांनी मजीप्राचे मुख्य अभियंता नरेश शनवारे यांना निवेदन दिले होते . निवेदन दिल्यानंतर काही दिवस पाण्याचा पुरवठा व्यवस्थीत राहतो . काही दिवस गेले की तेच ये रे माझ्या मांगल्या .दवलामेटी येथील नागरीकांनी फेब्रुबारी महीन्यात याबाबतची तक्रार आमदार समीर मेघे यांच्याकडे केली होती

 आमदार समीर मेघे यांनी या समस्येच्या निराकरणासाठी दवलामेटी ग्रामपंचायत मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता सतीश सुशील ,मुख्यअभियंता नरेश शनवारे ,अभियंता सुनील भांडारकर,ग्रामविकास अधिकारी विष्णू पोटभरे, सरपंच आनंदाताई कपनीचोर ,उपसरपंच गजानन रामेकर ,ग्रा. प. सदस्य नितीन अडसड,प्रशांत केवटे ,संजय कपनीचोर , रमेश गोमासे ,रश्मी पाटील ,विशाल कुमरे , कमल पेंदाम ,राजेश चांदेकर यांच्या उपस्थितीत या विषयी माहीती दिली होती .

वाडीत येणाऱ्या दुषित पाणी संदर्भात बहुजन समाज पार्टी तर्फे ११ फेब्रुवारी रोजी मजीप्राचे मुख्य अभियंता नरेश शनवारे यांना प्रणय मेश्राम, राहुल सोनटक्के गौतम मेश्राम, पराग रामटेके, बंडू बोंदाडे, सुधाकर सोनपिपले यांच्या नेतृत्वात निवेदन दिले होते .त्यानंतर आज पर्यंत पाणी पुरवठा व्यवस्थित सुरू होता .आज मात्र वाडी, दवलामेटी परिसरात दुषित पाणी पुरवठा सुरू आहे . येणाऱ्या दुषित पाणी पुरवठयाकडे मजीप्राच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दयावे अशी मागणी स्थानीक नागरीकांनी केली आहे .