समाजातील इच्छुकांनी समोर येऊन मदत करा:खासदार बाळू धानोरकर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०२ एप्रिल २०२०

समाजातील इच्छुकांनी समोर येऊन मदत करा:खासदार बाळू धानोरकर


लोकसभा क्षेत्रात दररोज तीन हजार गरजूना मिळणार भोजन
चंद्रपूर : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ३३५ वर पोहचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेली ही माहिती अतिशय गंभीर असून नागरिकांनी लॉकडाऊनला गंभीरतेचे सहकार्य न केल्यास लॉकडाऊन कालावधी वाढवावा लागू शकतो. कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. हि बाब आपल्या देशासाठी व महाराष्ट राज्यातील चिंतेची बाब आहे. देशातील कोरोनाग्रस्थांची संख्या १६०० च्या वर गेली आहे. आणि त्यात सर्वाधिक ३३५ राज्यातील रुग्ण आहेत. 

या मध्ये हातावर आणून पानावर खाणाऱ्या गरिबांची उपासमार होता कामा नये, यासाठी लोकसभा क्षेत्रातील तीन हजार गरजूना भोजनाची व्यवस्था खासदार बाळू धानोरकर यांनी केली असून समाजातील इच्छुकांनी देखिल समोर येऊन मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 

आज खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी वरोरा येथील विश्रामगृह येथे शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन माहिती घेतली. 

यावेळी उपविभागीय अधिकारी शिंदे,उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे, तहसीलदार सचिन गोसावी, तहसीलदार महेश शिंतोडे, वैद्यकीय अधिकारी दुबे, मुख्याधिकारी बनोरे, मुख्याधिकारी वरोरा बल्लाड, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, नगराध्यक्ष एहतेशाम अली, माजी नगराध्यक्ष विलास टिपले, नगरसेवक राजू महाजन, मिलिंद भोयर, विकास डोंगरे, सुभाष डोंगरे यांची उपस्थिती होती. 

यावेळी वरोरा, भद्रावती तालुक्यातील रेशनकार्ड नसलेल्या व बंद पडलेल्या गरजूना पुरवठा करा, समाजातील इच्छुकांनी समोर येऊन तहसील कार्यालय येथे जाऊन मदत करावी, विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन यावेळी खासदार बाळू धानोरकर यांनी केले. त्यासोबतच व्यापारी व व्यवसायिकांनी देखील मानवतेच्या दृष्टीतून आपल्या कामगारांना अन्नधान्य जीवनावश्यक वस्तुपुरवठा करावे असे नम्र आवाहनही त्यांनी केले. 

आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी जीवावर उदार होऊन आपल्यासाठी अहोरात्र झटत आहेत. अनेक समाजसेवी संस्था देखील हिरीरीने मदत कार्यात सहभागी आहेत या सर्वांचे आभार खासदार धानोरकर यांनी मानले.