#चंद्रपूर:धक्कादायक;वडिलांनी पोटच्या 2 मुलावर केला गोळीबार,मग स्वतावर गोळी झाडून केली आत्महत्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२८ एप्रिल २०२०

#चंद्रपूर:धक्कादायक;वडिलांनी पोटच्या 2 मुलावर केला गोळीबार,मग स्वतावर गोळी झाडून केली आत्महत्या

चंद्रपुर/प्रतींनिधी:
 बल्लारपूर शहरातील भगतसिंग वार्ड येथे राहणारे मुलंचंद द्विवेदी वय-५० यांनी घरघुती वादावरून आपल्या पोटच्या आकाश द्विवेदी वय -२२, आणि पवन द्विवेदी वय - २० दोन मुलांवर गोळीबार करून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे थरारक घटना आज सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली आहेत.

हि घटना घरघुती वादावरून घडल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर येत आहेत. या घटनेत वडील मुलंचंद द्विवेदी यांनी आधी आकाश द्विवेदी यांच्या छातीत गोळी झाडल्यानंतर दुसरा मुलगा पवन द्विवेदी यांच्यावर गोळी झाडून ठार केले आणि यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहेत.

यामध्ये वडील मुलचंद आणि आकाश यांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर पवन गंभीर जखमी असल्याने उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहेत. या हल्यात गोळी इतरत्र गेल्याने पुतण्या कुलदीप शिवचंद द्विवेदी थोडक्यात बचावला आहेत.हल्लेखोर मुलचंद द्विवेदी हे माजी भाजपा अध्यक्ष तथा बल्लारपूर नगर परिषदेचे स्वीकृत सदस्य शिवाचंद द्विवेदी यांचे भाऊ आहेत.