चंद्रपुरच्या त्या २ कोरोनाच्या रुग्णांची नोंद ‘अन्य’ विकल्पात करा:हंसराज अहीर यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांंच्याकडे मागणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२३ एप्रिल २०२०

चंद्रपुरच्या त्या २ कोरोनाच्या रुग्णांची नोंद ‘अन्य’ विकल्पात करा:हंसराज अहीर यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांंच्याकडे मागणी


चंद्रपुर/प्रतिनिधी:
कोवीड - 19 विषाणूचे संकट संपूर्ण देशात असतांना चंद्रपूर जिल्हयात आजतागत एकही रूग्ण नाही हे या जिल्हयातील अधिकारी व नागरिकांच्या प्रयत्नांची फलश्रुती आहे. सर्व विभागातील अधिका-यांनी कोरोणा मुक्त जिल्हा करण्यासाठी सुक्ष्म नियोजन व कार्य केले आहे. यात सर्व अधिकारी कौतुकाचे मानकरी आहेतच सोबतच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या लाॅकडाऊनच्या आवाहनाचे व सुचनांचे काटेकोरपणे पालण करणा-या चंद्रपूर जिल्हयातील नागरिकांचे आहे. 

असे असतांना कोवीड19इंडिया.ओआरजी या संकेतस्थळावर चंद्रपूर जिल्हयात 2 रूग्णांची नोंद असल्याचे नमुद करण्यात आले आहे. सदर 2 रूग्णांची नोंद या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ‘अन्य’ विकल्पात करून चंद्रपूर जिल्हयातील अधिकारी व नागरिकांनी कोरोणा विरोधात केलेल्या युध्दाचा सन्मान करावा अशी मागणी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्राच्या माध्यमातून केली आहे

कोवीड19इंडिया.ओआरजी (covid19india.org) या संकेतस्थळावर चंद्रपूर ला कोरोणा मुक्त जिल्हा म्हणून घोषित करून चंद्रपूर जिल्हयातील अधिकारी व नागरिकांच्या प्रयत्नांचा सन्मान करा.

चंद्रपूर जिल्हयाच्या नावाने दर्षवीत असलेले 2 रूग्ण हे फक्त चंद्रपूर येथील रहिवासी असून ते इंडोनेषीया येथून परत येत असतांना परस्पर त्यांची वैद्यकीय चाचणी ही नागपूर विमानतळ येथे करण्यात आली असतांना त्यांना त्वरीत नागपूर येथे वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली.
 सदर रूग्णांचा कोरोणा बाधीत झाल्यावर कुठलाही संबंध चंद्रपूर जिल्हयाशी आलेला नाही. सदर व्यक्तींचे काही महिण्यांपासून चंद्रपूर येथे वास्तव्य नव्हते. असे असतांना उपरोक्त नमुद संकेतस्थळावर चंद्रपूर जिल्हयात 2 रूग्ण नमुद असणे म्हणजे चंद्रपूर जिल्हयातील अधिकारी व नागरिकांनी केलेल्या प्रयत्नांचे अपयश आहे. सदर जिल्हा ग्रीन झोन मध्ये असतांना देखील आज ग्रीन झोन मध्ये नाही हे जिल्हयाचे दुर्देव आहे अशी खंत सुध्दा अहीर यांनी पत्रात व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे या दोन्ही कोरोना रुग्णांची नागपुरच्या रुग्णालयातूून  सुट्टी झालेली असून ते नागपूर येथेच थांबलेले आहेत, त्यांचे शेवटचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाल्यानेे त्यांना सुट्टी् देण्याात आली ,मात्र त्यांना जिल्हा ओलांडायची परवानगी नसल्याकारणाने त्यांना पुढील काही दिवस नागपुरातच थांबायला जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

या कोरोणा बाधीत मात्र चंद्रपूर जिल्हयाशी संबंध नसलेल्या 2 रूग्णांची नोंद या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ‘अन्य’ विकल्पात करून चंद्रपूर जिल्हयातील अधिकारी व नागरिकांनी कोरोणा विरोधात केलेल्या युध्दाचा सन्मान करावा अशी मागणी हंसराज अहीर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.