चंद्रपुर:कूलर किव्हा AC लावला तर मनपा वसूल करणार दंड ? - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१३ एप्रिल २०२०

चंद्रपुर:कूलर किव्हा AC लावला तर मनपा वसूल करणार दंड ?

उकाडा वाढल्याने कूलरची विक्री तेजीत ...
 चंद्रपूरकर घेत आहे,पंख्याची गरम हवा
चंद्रपूर/ललित लांजेवार:
देशावर कोरोंनाचे संकट आहे,त्यामुळे कूलर एसी लाऊ नका त्यामुळे कोरोंना फैलतो,असा संदेश  सध्या चंद्रपूरातील घरा घरात ऐकू येत आहे, मार्च महिना सुरु झाला कि चंद्रपुरात कडक उन्हाळा तापू लागतो. अनेकांचे   कूलर  व  एसी सुरू होतात . मात्र  कूलर किव्हा एसी लावला तर मनपा दंड ठोकत आहे असा मॅसेज चंद्रपुरमध्ये पसरला  आहे. या मॅसेजमुळे चंद्रपूरकर पंख्याची गरमी हवा खात आहेत.  एप्रिल महिन्यात चंद्रपुरात कुलर किव्हा AC न लागणे म्हणजे  वनवास भोगणे होय. 

मागील काही दिवसांपासून चंद्रपूर शहरात कूलर लावला तर महानगरपालिका दंड ठोकणार अशी  फेक बातमी वाऱ्याच्या वेगाने फिरू लागली. त्यामुळे अनेकांनी आपल्या घरची लावलेले कुलर बंद ठेवले,तर अनेकांनी कुलर लावलेच नाही, 

चंद्रपूर हा देशात सर्वात जास्त तापणारा जिल्हा आहे. येथील तापमान देशातील ईतर ठिकाणापेक्षा सर्वात जास्त असते.प्रत्येक उन्हाळ्यात फेब्रुवारी महिन्यापासून येथे    कुलर सुरू केल्या जातात.  मात्र यंदा कोरोणाचे सावट असल्यामुळे  विषाणू थंड वातावरणात जास्त काळ टिकत असल्याचे सांगत चंद्रपुरात कुलर लावू नका अन्यथा मनपा दंड ठोठावणार अशी माहिती माऊथ पब्लिसिटीच्या मार्फत पसरू लागली आहे. 

 विशेष म्हणजे चंद्रपुरात कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याने व कुलर आणि करणाचा संबंध नसल्याकारणाने चंद्रपुरात ही अफवा ठरलेली आहे.  अनेक ठिकाणी महानगरपालिकेकडून काही लोक आले असल्याची माहिती लोक एकमेकांना सांगून कुलर बंद करण्याच्या आवाहन करत आहेत.  तर यासंदर्भात महानगरपालिकेच्या अधिकृत माहिती अधिकारी श्री. युधिष्ठीत राईच  यांना विचारले असता याविषयी कोणताच मेसेज महानगरपालिकेकडून जनतेला दिला  गेला नाही, किव्हा  याविरोधात कारवाई करण्याचे आदेश देखील दिले नाही, शहरात जे लोक घरो घरी जात आहेत ते मनपाचे नाही,  हि एक अफवा असल्याच्या चंद्रपूर मनपा कडून स्पष्ट करण्यात आले आहे, 

त्यामुळे शहरात वाऱ्याच्या वेगाने फिरणारी माहिती हि एक फक्त अफवा असल्याचे  समोर आले आहे. त्यामुळे चंद्रपूरकर बिनधास्त कुलर लावू शकतात हे सिद्ध झाले आहे. 
पहिलेच लॉकडाऊन आणि यामुळे अनेक लोक कूलर किव्हा त्याचे सुटे भाग सामान खरेदी करण्यासाठी जाऊ शकत नाही. यामुळे अनेकांचे कुलर बंद आहेत व ज्यांचे पोट उन्हाळ्यात कुलर विक्रीमुळे चालतात त्यांचा रोजगार बुडाला आहे, एकूणच याचा परिणाम कूलर विक्रीच्या व्यवसायावंंर होत हा कुलर विक्रीचा व्यवसाय देखील थंडावला आहे.  

यासंदर्भात तुमच्या घरी कोणी कूलर बंद करा म्हणून आले तर त्यांची संपूर्ण चौकशी करा, काही संशय येताच चंद्रपूर मनपा किव्हा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क करा.