चंद्रपुर:40 गावकर्‍यांना जेवणातून विषबाधा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१२ एप्रिल २०२०

चंद्रपुर:40 गावकर्‍यांना जेवणातून विषबाधा

चंद्रपुर/प्रतींनिधी:
देशात कोरोंनासारख्या गंभीर परिस्थित संचारबंदी लागू असतांना ग्रामीण जनता मात्र गर्दी व घोडके करून जेवायला जाऊ लागले आहे.अश्याच चंद्रपूरात तेरवीच्या जेवणातून 40 लोकांना  जेवणातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे.

चंद्रपूर शहरालगत मूल मार्गावरच्या अजयपुर गावात हा प्रकार घडला.शनिवारी अजयपुर येथील पोलिस पाटलाच्या घरी तेरवीचे जेवण होते. यासाठी गावाला निमंत्रण देण्यात आले होते. मात्र दुपारपासून जेवण केलेल्या लोकांना मळमळ उलट्या व तापाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर या सर्व बधितांना जवळच्या चिचपल्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती  करण्यात आले. तर काही जणांवर चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ग्रामीण भागात संचारबंदी सुरळीत राहावी याची जबाबदारी पोलीस पाटलांना देण्यात आली आहे.   मुख्य म्हणजे  पोलिस पाटलांकडूनच संचारबंदी कायद्याचे उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे पोलिस पाटलाला कोरोंनाचे  गांभीर्य नसल्याचे समोर आले आहे.