चंद्रपुर:दारूबंदी विभागाच्या कार्यालयातूनच लाखो रुपयाची दारू चोरीला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१३ एप्रिल २०२०

चंद्रपुर:दारूबंदी विभागाच्या कार्यालयातूनच लाखो रुपयाची दारू चोरीला

चंद्रपुर/प्रतींनिधी:
याअगोदर चोरट्यांनी घरात दुकानात कारखान्यात व इतर अन्य ठिकाणी चोरी करून लाखो रुपये पळविल्याची घटना तुम्ही ऐकली असाल मात्र आज आम्ही तुम्हाला जी बातमी देणार आहोत ती बातमी ऐकून तुम्हाला नवल वाटेल.
चंद्रपूरची तशी दारूबंदी जिल्हा म्हणून ओळख मात्र या चंद्रपुरात दारूबंदी विभागाच्या कार्यालयात जर चोरट्यांनी दारूची चोरी केली आणि तेथून लाखो रुपयांचा माल चोरून नेल्याचे तुम्ही ऐकल्यास तुम्हाला नवल तर वाटेलच.
हो असाच काहीसा प्रकार चंद्रपुरातील राजुरा तालुक्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात घडला. या कार्यालयात चोरट्यांनी डल्ला टाकत लाखो रुपयाची दारू चोरून नेली.

9 एप्रिल ला कार्यालयातील सर्व कर्मचारी काम आटोपून घरी गेले या नंतर शासकीय सुट्ट्या आल्याने या कार्यालयातील कर्मचाऱ्याने रविवारी काही शासकीय कामानिमित्त हे कार्यालय उघडले.यावेळी चोरी झाल्याचे  समोर आले. 

यात कार्यालयातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडून होता आणि ज्या ठिकाणी जप्त दारूसाठा होता त्या ठिकाणाची संपुर्ण दारू चोरट्यांनी लंपास केली होती.

हा संपूर्ण प्रकार रविवारी कार्यालय उघडल्यावर कर्मचाऱ्याच्या लक्षात आला यानंतर दारूच्या व्यसनापायी व दारूविक्री पाई काही चोरट्यांनी दारू चोरून नेली. सदर प्रकरणाची तक्रार कार्यालय कर्मचाऱ्यांनी राजुरा पोलिसात दाखल केली.

त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कार्यालयात जाऊन चौकशी करत पुढील तपास सुरू ठेवला आहे मात्र जर दारूबंदी जिल्ह्यात दारूची चोरी होणं जितकं नवलाची गोष्ट आहे तीतकीच दारूबंदी विभागाच्या कार्यालयात होणारी चोरी ही देखील हास्यास्पद गोष्ट आहे. यावरून चोरट्यांना कायद्याची भीती नसल्याचे स्पष्ट होत आहे. 
नेमके किती बॉक्‍स चोरले यावर व्यक्‍त होतोय संशय 
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गोदामातून चोरी झालेल्या दारूच्या बॉक्‍सच्या संख्येबाबत संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेत दारूचे नेमके 17 बॉक्‍स चोरी गेले आहेत, की त्यापेक्षा कमी याबाबत उलटसुलट चर्चा रंगली आहे. 
सदर कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखा तसेच राजुराचे ठाणेदार नरेंद्र कोसूरकर करीत आहेत.