चंद्रपुर:अन्नधान्य किट वाटपाची किटकिट;हे पण “राजकारण” ठरवणार का ? ट्विटरवर भाजप कडून समाचार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२४ एप्रिल २०२०

चंद्रपुर:अन्नधान्य किट वाटपाची किटकिट;हे पण “राजकारण” ठरवणार का ? ट्विटरवर भाजप कडून समाचार


नागपुर/ललित लांजेवार:
महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुण एका स्थानिक वृत्त वाहिनीच्या माध्यमातून बातमी प्रकाशित करण्यात आली होती, याच बातमीचा आधार घेत भाजप ने कोंग्रेसवर काॅंग्रसचे खासदार @BalubhauOffice हे राज्य सरकारवर PPE कीटचे व्यवस्थित वाटप केले नाही म्हणून तक्रार व नाराजी व्यक्त करताना.हे पण “राजकारण” ठरवणार का ?अश्या आशयाखाली ट्विट करत कोंग्रेसचा समाचार घेण्यात आला. विशेष म्हणजे ट्विटमध्ये खासदार बाळू  धानोरकर यांना टॅग करण्यात आले.
कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे असलेल्या संचारबंदीने उद्योग,बाजारपेठा ,रोजगार बंद असतांना अशा परिस्थित शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर हातावर आणून पानावर खाणार्‍या नागरिकांचे हाल झाले.

अश्या परिस्थित अनेक दानशूर व राजकरणी समाजकारणी नागरिकांनी हात समोर करत मदत केली. तर शासनातर्फे देखील अन्नधान्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र या अन्न धाण्याच्या किट वाटपात प्रचंड असमतोल आहे.अन्नधान्याच्या किटस नेमक्या कुणाला वाट्याल्या याचा हिशोब नाही,त्याचा हिशोब द्यावा अशी मागणी काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर व काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे  यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे करून पालकमंत्र्यांच्या एका सामाजिक दायित्वावर प्रश्नचिन्ह उभे केले होते.
सत्ताधार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना जाब का विचारला तर याच संधीचा फायदा विरोधक भाजप ने घेत ट्विटरच्या माध्यमातून पलटवार केला.विशेष म्हणजे 
ते PPE ( Personal Protective Equipment) किट वाटपातील आरोप  नव्हते,तर अन्न धान्य वाटपाच्या किटवरून प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.

महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुण एका स्थानिक वृत्त वाहिनीच्या माध्यमातून बातमी प्रकाशित करण्यात आली होती, याच बातमीचा आधार घेत भाजप ने कोंग्रेसवर काॅंग्रसचे खासदार @BalubhauOffice हे राज्य सरकारवर PPE कीटचे व्यवस्थित वाटप केले नाही म्हणून तक्रार व नाराजी व्यक्त करताना.हे पण “राजकारण” ठरवणार का ?
अश्या आशयाखाली ट्विट करत कोंग्रेसचा समाचार घेतला. विशेष म्हणजे ट्विटमध्ये खासदार बाळू  धानोरकर यांना टॅग करण्यात आले.
या किट्स शासनामार्फत कमी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाच जास्त वाटल्या जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मित्रपक्षांना विश्वासात घ्यायला हवे, असे धानोरकर यांचे म्हणणे आहे. यानिमित्ताने खासदार धानोरकर आणि आमदार धोटे यांची पालकमंत्र्यांवरील नाराजी समोर आली.

 विशेष म्हणजे   खासदार धानोरकर यांनी स्पष्ट शब्दात यापुढे तहसीलदार आणि संबंधित पालिकेचे मुख्याधिका-यामार्फ़त किटसचे वाटप झाले पाहिजे.ज्यात शासनाचा पैसा असेल त्यात राजकीय व्यक्ती नको, असे त्यांनी सुनावले. 
याच विषयावर दुसऱ्यादिवशी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री तसेच राज्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी  खुलासा करत जिल्ह्यामध्ये 40000 अन्नधान्याचे किट वाटपाचे नियोजन होते मात्र ते पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे असे संगितले. 

 पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्वतः अन्नधान्य वाटप काही दानशूर संस्था उद्योग व व्यक्तींची मदत आणि त्या काही स्वखर्चातून अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले असे जाहीर स्पष्ट केले. 

या प्रकारामुळे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे तोंडघशी पडले. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 40000 अन्नधान्याचे किट वाटप करण्याबाबतचे नियोजन आपण केले होते.  मात्र 12 ते 13 हजार अन्नधान्याच्या किटच्या आतापर्यंत वाटप करता आले यामध्ये स्वयंसेवी संस्थांनी काही वाटा उचलला होता व काही वाटा आपण स्वतः उचललेला होता.  सामाजिक दायित्व निधीचा कोणताही वापर करण्यात आलेला नाही असा खुलासा वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केला असे ते म्हणले. 

  यासाठी माणुसकीतून अतिशय सामंजस्याने मदत करणे गरजेचे आहे त्यानुसार राजकारण न करता लोकहितासाठी सर्वांनी पुढे यायचे असे आवाहनही यावेळी वडेट्टीवार यांनी केले.  होते मात्र दुसऱ्या दिवशी चक्क भाजपच्या महाराष्ट्र भाजप ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून काँग्रेसचा समाचार घेतला.