चंद्रपूर:मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत:आतापर्यंत 65 लक्ष रुपये जमा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२७ एप्रिल २०२०

चंद्रपूर:मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत:आतापर्यंत 65 लक्ष रुपये जमा

See the source image
माजी आमदार वामनराव चटप यांच्याकडून
चंद्रपूर/प्रतिनिधी:
देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूच्या या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्यापरिने गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करीत असून या संकटावर मात करण्यासाठी आवश्यक निधी कोविड-19 या माध्यमातून जमा केला जात आहे.कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मदत निधीचे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनास उत्तम प्रतिसाद मिळत असून या आवाहनास प्रतिसाद देत अनेक संस्था, व्यक्ती यांनी जिल्हा सहायता निधीच्या खात्यात देणग्या देणे सुरू केले आहे.

आज प्रामुख्याने हिंदुस्तान लालपेठ ओपनकास्ट कामगार सह. पतसंस्था, चंद्रपूरचे अध्यक्ष विकास गण्यारपवार, सचिव सुधाकर चन्ने व व्यवस्थापक सुधाकर गणवीर यांच्या हस्ते रु.51 हजार, सन्मित्र महिला नागरी सह. बँक चंद्रपूरच्या वतीने रु.1 लक्ष , अंत्योदय स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था चंद्रपूरच्या वतीने रु.25 हजार तर आदिवासी विविध कार्यकारी सह. संस्था राजुराच्या वतीने रु.11 हजाराचा धनादेश जिल्हा सहाय्यता निधी देण्यात आला.

त्यासोबतच कोविड विषाणुच्या प्रादुर्भावावर राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून या उपाययोजनांमध्ये अनेक स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक स्थळे स्वंयप्रेरणेने सहभागी होत आहेत, मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करत आहेत, करू इच्छित आहेत. केवळ याच प्रयोजनार्थ मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19) हे स्वतंत्र बँक खाते उघडण्यात आले आहे.

आज मुख्यमंत्री सहायता निधी कोविंड-19 या स्वतंत्र बँक खात्यामध्ये राजूराचे माजी आमदार वामनराव चटप यांच्यावतीने रु.10 हजाराचा धनादेश सहायता निधीस देण्यात आला. तर चंद्रपूर जिल्हा सहकार विभाग शासकीय कर्मचारी प्रत्यय सह.संस्था चंद्रपूरच्या वतीने रु.51 हजाराचा धनादेश मदत निधीस देण्यात आला.
मदतीसाठी या बँक खात्यात निधी जमा करा 
कलेक्टर चंद्रपूर कोव्हिड-19 या नावाने जिल्ह्यातील अग्रणी बँक ऑफ इंडियामध्ये ‍ स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून खाते क्रमांक 960310210000048 असून यासाठी आयएफएससी कोड BKIDOOO9603 असा आहे. जिल्ह्यातील उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.