चंद्रपूरात १५० खोल्यात ३२० बेडची क्षमता असलेले वसतिगृह कोरोनाच्या उपचारासाठी सज्ज - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१५ एप्रिल २०२०

चंद्रपूरात १५० खोल्यात ३२० बेडची क्षमता असलेले वसतिगृह कोरोनाच्या उपचारासाठी सज्ज


इन्स्पाअरचे संचालक प्रा. विजय बदखल यांचा पुढाकार
चंद्रपूर/ललित लांजेवार:
सध्या संपूर्ण जग कोरोना विषाणूशी लढा देत आहे. त्यात चंद्रपूर जिल्हा आजतागायत जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांच्या नेतृत्वात सुरक्षित राहिला आहे. जिल्ह्यात जरी आजच्या घडली एकही कोरोना बाधित रुग्ण नसला तरी मात्र बाधित रुग्ण दाखल होण्याचे नाकारू शकत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासन आपल्या परीने संपूर्ण तयारी करत आहे.

अश्यातच आपात्कालीन परिस्थितीत शासन स्तरावर रुग्णाची व्यवस्था असावी म्हणून येथील इन्स्पाअरचे संचालक प्रा. विजय बदखल (इन्स्पाअर ही एक शिक्षण संस्था आहे) यांनी आपल्या संस्थेच्या ४ अद्ययावत बिल्डिंग (वसतिगृह) प्रशासनास उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. 
कोरोना संकटाच्या पाश्र्वभूमीवर येथील संचालक डॉ. विजय बदखल यांनी मंगळवारी  तसे निवेदन जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांना पत्राद्वारे दिले आहे. 
कोणी पैसे,कोणी अन्न, तर कोणी आणखी काही, प्रत्येक जन आप आपल्या परीने शासनाला होईल त्या पद्धतीने मदत करत आहेत.  अश्यातच बदखल यांनी आपल्या इन्स्पाअर नावानी चालत असलेले शिक्षण संस्थेचे अद्ययावत वसतिगृह शासनाच्या व चंद्रपूरकरांच्या मदतीला दिले. 

कोरोना विषाणूचा हा लढा इतक्यात संपणारा नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या कामात नागरिक म्हणून त्यांनी खारीचा वाटा उचलण्याचा निर्णय घेतला आहे. इन्स्पायर या क्लासेस मार्फत चंद्रपुरकरांवर   तातडीने उपचार व्हावा म्हणून चार अद्ययावत वसतिगृह शासनाच्या स्वाधीन सध्या देण्यात आले आहे. या वसतिगृहाची क्षमता १५० खोल्यांची आहे. त्यात ३२० बेडची व्यवस्था आहे. हे चारही वसतिगृह वातानुकूलित आहे. येथे सीसीटीव्ही कॅमेरेही आहेत. विजय बदखल हे गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील सामाजिक उपक्रमात सहभागी असतात.

 प्रशासनाच्या कामात आमचा ही खारीचा वाटा असावा, यासाठी वसतिगृह प्रशासनाच्या सेवेत देण्याचे मी ठरवले असे प्रा. विजय बदखल यांनी संगितले.