चिमूर तालुक्यातील व खडसंगी वनपरिक्षेत्रा अंतर्गत भीसी उपक्षेत्र मधील भिसि ते जामगाव रोड लगत वैधरित्या तोड करून साठवण ठेवलेल्या 12 ट्रॅक्टर साग इमारत व साग बीटांवर धाड टाकत जप्त केला. 
ही कारवाई 13 एप्रिल रोजी सकाळी करण्यात आली. 12 ट्रॅक्टर साग इमारत व साग बीटांची अवैधरित्या तोडूण साठवण ठेवल्याची गोपनीय माहिती वनविकास महामंडळाच्या विशेष पथकाला मिळताच विशेष पथक प्रमुख रमेश बलैया वन परिमंडळ अधिकारी व आशिष बायस्कर क्षेत्र सहाय्यक भिसी, वनरक्षक आर.पी.आगोसे यांनी मोका स्थळावर जाऊन सदर अवैद्य सागवान जप्त केले.घटनास्थळावर कोणीही आरोपीं न भेटल्यामुळे सध्या आरोपीचा शोध घेणे सुरू आहे .करोडोचा सागवान असल्याने सदर प्रकरण खूप मोठे रॅकेट असण्याचे शक्यताही नाकारता येत नाही. 

चंद्रपूर जिल्ह्यातील आजपर्यंतची सर्वात मोठी कार्यवाही असल्याचे सांगण्यात येत आहे. वनविकास महामंडळाच्या विशेष पथकाने वनविभागाच्या कार्यक्षेत्रात जाऊन ही कारवाई केली आहे.  

T